कागलच्या शाहू कारखान्याची विनाकपात 3032 रुपयांची पहिली उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 4:03pm

राज्यात सर्वाधिक उसदर देण्याची परंपरा असणाऱ्या कागलच्या शाहू कारखान्याने शुक्रवारी ३0३२ रुपयांची पहिली विनाकपात उचल जाहीर केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी ही घोषणा केली. विनाकपात 2830 अधिक 200 रुपये असा 3032 रुपयांची उचल जाहीर केली आहे.

कागल, दि. १0 : राज्यात सर्वाधिक उसदर देण्याची परंपरा असणाऱ्या कागलच्या शाहू कारखान्याने शुक्रवारी ३0३२ रुपयांची पहिली विनाकपात उचल जाहीर केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी ही घोषणा केली. विनाकपात 2830 अधिक 200 रुपये असा 3032 रुपयांची उचल जाहीर केली आहे. परंपरेप्रमाणे शाहू कारखान्याकडून देण्यात येणारा अंतिम दर सर्वात जास्त असेल असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. कागल येथील श्रीमंत छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या २0१७-१८ या गळीत हंगामासाठी पहिली उचल विनाकपात एकरकमी प्रतिटन ३0३२ रुपये इतकी देत असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंग घाटगे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

शासनाच्या निर्णयानुसार या हंगामासाठी शाहू कारखान्याची एफआरपी प्रतिटन २८३२ इतकी होते. परंतु मागील आठवड्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटना यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निघालेल्या तोडग्यानुसार एफआरपीमध्ये प्रतिटन २00 रुपयांची वाढ सर्वांनी मान्य करुन पहिल्या उचलीबाबतचा प्रश्न सोडविला होता.

याशिवाय एफआरपीबरोबर प्रतिटन १00 रुपये आणि नंतर प्रतिटन १00 रुपये अशी प्रतिटन २00 रुपयांची वाढ देण्याचे निश्चित करुन त्यास सर्वांनी मान्यता दिली होती.

शाहू कारखान्याने मात्र हे दोनशे रुपयांची वाढ एफआरपीबरोबरच देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शाहू कारखान्याची पहिली उचल प्रतिटन ३0३२ रुपये इतकी निश्चित करुन त्याप्रमाणे उस बिले अदा करण्यात येणार आहे.

ही पहिली उचल असून शाहू कारखान्याच्या परंपरेनुसार या हंगामासाठीही निश्चितच चांगला दर देण्यात येणार आहे, असे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.

कारखान्याचा सन २0१७-१८ या चालू गळीत हंगाम सुरळीतपणे सुरु झाला असून या हंगामाकरिता कारखान्याने ८ लाख २५ हजार टन गळीताचे उद्दीष्ट्य निश्चित केले आहे. व्यवस्थापनाने या हंगमाासाठी प्रतिदिनी ७५00 टन गळीताचे विस्तारीकरण पूर्ण केले आहे.

संबंधित

कन्सल्टंटच्या निष्क्रियतेने प्रकल्पांचे तीन तेरा!
कोल्हापुरातील दिग्दर्शक अजय कुरणे यांचा ‘बलुतं’ ‘इफ्फी’मध्ये, मराठीतील अवघ्या दोनच लघुपटांचे होणार प्रदर्शन
सोलापूर जिल्ह्यात ऊसदर आंदोलन पेटले, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर प्रहार संघटनेचे आंदोलन
नाशिक, नगर जिल्ह्यातील कारखान्यांनी काटा मारला, ऊस उतारा चोरला; शेतकरी संघटनांची तक्रार, कोंडी फोडण्यासाठी १८ नोव्हेंबरला संयुक्त बैठक
महिला पोलीस अधिकारी दीड वर्षापासून बेपत्ता, घातपाताचा संशय; तपासाकडे दुर्लक्ष

कोल्हापूर कडून आणखी

कोल्हापुरातील दिग्दर्शक अजय कुरणे यांचा ‘बलुतं’ ‘इफ्फी’मध्ये, मराठीतील अवघ्या दोनच लघुपटांचे होणार प्रदर्शन
सिंह राशीतील उल्कावर्षावाचा आज रात्री बारा वाजता घ्या अनुभव
...तर ‘दौलत’ची विक्रीची निविदा : मुश्रीफ, ताळेबंदावर आक्षेप घेतल्यापासून कर्मचारी युनियनशी सुसंवाद संपला
कोल्हापूर पोलीस मुख्यालयासमोर महिलेचा पती-मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न
शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी उत्साहात मतदान सुरु

आणखी वाचा