Farmers' hurry to participate in the Kisan Samman Yojana | किसान सन्मान योजनेतील सहभागासाठी शेतकऱ्यांची धांदल
किसान सन्मान योजनेतील सहभागासाठी शेतकऱ्यांची धांदल

ठळक मुद्देदोन दिवसांत विकास संस्थांच्या पातळीवर यादी २६ फेबु्रवारीपर्यंत अंतिम यादी तयार होणार

कोल्हापूर : केंद्र सरकारने देशातील शेतकºयांसाठी ‘किसान सन्मान निधी’ योजनेची घोषणा केली असून, त्यासाठी दोन हेक्टरच्या आतील शेतकºयांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्यासाठी गावोगावी शेतकºयांची एकच धांदल उडाली आहे. दोन दिवसांत विकास संस्थांच्या पातळीवर याद्या तयार होणार असून, २६ फेबु्रवारीपर्यंत अंतिम यादी सरकारकडे पाठविली जाणार आहे.

विविध संकटांनी अडचणीत आलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली होती. पाच राज्यांतील निवडणुकीत शेतकºयांच्या रोषाचा अनुभव भाजप सरकारला आला. तीन राज्यांतील सत्ता गमवावी लागल्यानंतर केंद्र सरकार जागे झाले आणि शेतकºयांसाठी काहीतरी मदत करण्यासाठी पुढे आले. केंद्राच्या १ फेबु्रवारीच्या अंतरिम बजेटमध्ये मध्यमवर्गीय शेतकºयांसाठी विविध योजना जाहीर केली. दोन हेक्टरच्या आतील शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणली. यामध्ये शेतकºयांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम तीन टप्प्यांत शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केली जाणार असून, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश स्थानिक यंत्रणेला दिलेले आहेत.

यासाठी गाव कामगार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व विकास संस्थांचे सचिव यांची एक समिती तयार केली आहे. ही समिती शेतकºयांकडून अर्ज भरून घेणार आहे. त्यानुसार गेले चार-पाच दिवस गाव पातळीवर धांदल उडाली आहे. जिल्'ात बहुतांशी शेतकरी हे विकास संस्थांशी संलग्न आहेत; त्यामुळे त्यांच्याशी लवकर संपर्क साधता येऊ शकतो, म्हणून यादी तयार करण्याची जबाबदारी संस्थांच्या सचिवांवर सोपवली आहे.

प्रतिज्ञापत्र ही घेणार
अर्जासोबत आधारकार्ड व बॅँक पास बुक झेरॉक्स घेतली जाते. त्याशिवाय एक प्रतिज्ञापत्रही घेतले जाते. यामध्ये या योजनेच्या निकषानुसार लाभ घेत असून, चुकीची माहिती सादर केली, तर उचित कारवाई करण्यास संमतीचा उल्लेख आहे.
 

 


Web Title: Farmers' hurry to participate in the Kisan Samman Yojana
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.