भाताच्या ‘संशोधित’ वाणालाच शेतकऱ्यांची पसंती : बियाण्यांचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:19 AM2018-05-22T01:19:01+5:302018-05-22T01:19:01+5:30

कोल्हापूर : धूळवाफ पेरणीस सुरुवात झाल्याने भाताच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

Farmer's Choice: 'Rate of Revised' Rice: Seed Rate Stable | भाताच्या ‘संशोधित’ वाणालाच शेतकऱ्यांची पसंती : बियाण्यांचे दर स्थिर

भाताच्या ‘संशोधित’ वाणालाच शेतकऱ्यांची पसंती : बियाण्यांचे दर स्थिर

Next
ठळक मुद्देप्रतिकिलो २० रुपयांचे अनुदान; ७६ हजार टन खत उपलब्ध

कोल्हापूर : धूळवाफ पेरणीस सुरुवात झाल्याने भाताच्या बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. बाजारात विविध वाणांच्या बियाण्यांची रेलचेल दिसत असली तरी यंदा ‘संशोधित’ वाणालाच शेतकऱ्यांची अधिक पसंती दिसत आहे. विशेषत: भातामध्ये पारंपरिक वाणाला नापसंती दाखवीत ‘संशोधित’, ‘अवनि’, ‘पूनम’, ‘तृप्ती’, आदी सुधारित वाणांची खरेदी करताना दिसत आहेत.

जिल्ह्यात खरीप पेरणीत अन्नधान्याचे १ लाख ४८ हजार हेक्टरवर सर्वाधिक क्षेत्र आहे. अन्नधान्यामध्ये भात व नागलीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. भात बियाण्यांची सहज उपलब्धता पाहता पूर्वी पारंपरिक वाणांचा वापर करण्याकडे शेतकºयांचा कल होता; पण उत्पादकता व बाजारातील दर पाहता, सुधारित बियाणे वापराकडे शेतकरी वळले आहेत. पारंपरिक बियाण्याची उत्पादकता कमी असल्याने ‘संशोधित’ वाण वापरले जात आहे. यंदा ‘अवनि’, ‘पूनम’, ‘तृप्ती’, ‘शुभांगी’, ‘वायएसआर’ यांचा वापर वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यांद्वारे उत्पादन जास्त मिळतेच; पण ते खाण्यासाठी चांगले असल्याने शेतकरी या वाणांकडे वळला आहे.

‘महाबीज’कडून बियाण्यांची उपलब्धता स्थानिक विक्रेत्याकडे केली आहे. भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, उडदाच्या सर्वच वाणांवर प्रतिकिलो २० रुपये अनुदान दिले जाते. शेतकºयांनी ‘महाबीज’चे बियाणे खरेदी करताना सात-बारा, आधार कार्ड, फोन क्रमांक विक्रेत्यांना दिल्यानंतर अनुदान वजा करून पैसे द्यायचे आहेत. सोयाबीन १४ हजार क्विंटल, भात १८ हजार २७१ क्विंटल, ज्वारी ४१३ क्विंटल, भूईमूग २४०० क्विंटल यांसह इतर अशी ३५ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यांपैकी २२ हजार ९५८ क्विंटल बियाणे ‘महाबीज’कडून उपलब्ध झाले आहे.

यंदा खतांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. या हंगामासाठी १ लाख ९१ हजार टन रासायनिक खतांची मागणी होती; त्यापैकी १ लाख ४३ हजार टनाला मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी एप्रिल अखेर ७७ हजार टन खते उपलब्ध झाली आहेत.


घरच्या बियाण्यांचे प्रमाण घटले : घरचे बियाणे काढण्याच्या आपल्याकडील पद्धतीमुळे उत्पादकतेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे घरच्या बियाण्यांचे प्रमाण कमी होत चालले असून, भात ४३ टक्के, सोयाबीन ३४ टक्के, तुरीसह इतर कडधान्ये ४२ टक्के, तर भुईमूग ३ टक्के घरातील बियाणे वापरले जाते.

कृषी विभाग सज्ज
कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी पुरेशा बियाणे, खतांची उपलब्धता करून ठेवली आहे.
शेतकºयांना सहज बियाणे व खते उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक पातळीवरील विक्रेत्यांना सूचना केल्या आहेत.
 

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज असून, बियाणे व खतांची पुरेशी उपलब्धता आहे. शेतकºयांनी दर्जेदार बियाण्यांची निवड करावी, उगवण क्षमता तपासूनच घरातील बियाण्यांचा वापर करावा.
- चंद्रकांत सूर्यवंशी (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद)

वळवाचा पाऊस चांगला झाल्याने धूळवाफ पेरणीसाठी शेतकºयांची धांदल उडाली आहे. यंदा उसाचे क्षेत्र जास्त असल्याने खरिपाची पेरणी थोडी कमी होईल, असा अंदाज असून, पारंपरिकपेक्षा सुधारित बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती आहे.
- नितीन जंगम (बियाणे, खत विक्रेते)

Web Title: Farmer's Choice: 'Rate of Revised' Rice: Seed Rate Stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.