शेतकरी संघटनांचा सोमवारी विधानभवनावर मोर्चा : राज्यातील विविध संघटना सहभागी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 06:05 PM2018-11-20T18:05:49+5:302018-11-20T18:10:46+5:30

शेती उद्ध्वस्त करत शेतकऱ्यांचा जीव घेणाºया वन्यप्राण्यांना संरक्षण देणारा कायदा रद्द करा, या मागणीसाठी सोमवारी (दि. २६) शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष

Farmers' Associations Forum on the Legislative Assembly on Monday: Various organizations of the state will participate | शेतकरी संघटनांचा सोमवारी विधानभवनावर मोर्चा : राज्यातील विविध संघटना सहभागी होणार

शेतकरी संघटनांचा सोमवारी विधानभवनावर मोर्चा : राज्यातील विविध संघटना सहभागी होणार

Next
ठळक मुद्देवन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा आता वन्यप्राणी संरक्षण कायद्याचा आधार घेऊन काही मंडळी शेतकºयांच्या पोटावर उठली आहेत.

कोल्हापूर : शेती उद्ध्वस्त करत शेतकऱ्यांचा जीव घेणाºया वन्यप्राण्यांना संरक्षण देणारा कायदा रद्द करा, या मागणीसाठी सोमवारी (दि. २६) शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

रघुनाथदादा पाटील म्हणाले, विदर्भात एका वाघिणीने तेरा शेतकºयांचा बळी घेतला, तिला मारल्यानंतर वाघिणीच्या बाजूने ऊर बडवणाºयांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. वन्यप्राण्यांना मारण्याची शेतकºयांना हौस नाही; पण ते जंगल सोडून शेतात थैमान घालत आहेत. ऊस, मका, ज्वारी, सोयाबीन पिके उद्ध्वस्त करत आहेत. शेतीचे नुकसान करतात. मात्र, आता हे प्राणी माणसाच्या जिवावर उठले आहेत. विदर्भात तेरा लोकांचा बळी वाघिणीने घेतला. कुत्रे, डुकरे, माकडांच्या हल्ल्यात अनेक माणसे दगावल्याचे आपण रोज बघतो. माणसाचा जीव गेला तरी त्यांना मारायचे नाही, असा आमचा कायदा सांगतो.

सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. ऊस वाहतूक करणाºया शेतकºयांवरही बैलांच्या मानेवर जादा वजन ठेवल्याबद्दल गुन्हे दाखल केले जात आहेत. शेतकरी स्वत:च्या मुलापेक्षा चांगला सांभाळ आपल्या बैलांचा करतात. उदरनिर्वाह चालविण्यासाठी ऊसतोडीचे ते काम करतात.

आता वन्यप्राणी संरक्षण कायद्याचा आधार घेऊन काही मंडळी शेतकºयांच्या पोटावर उठली आहेत. ऊठसूट शेतकºयांवर निर्बंध लादायचे आणि इतरांना मोकाट सोडण्याचे षड्यंत्र सरकारचे आहे. या विरोधात राज्यभरात जनजागृती सुरू केली आहे. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढणार आहे. रविवारी (दि. २५) ठाणे रेल्वे स्थानकापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. संविधान दिनादिवशी, सोमवारी विधानभवनावर राज्यातील हजारो शेतकरी आपल्या हक्कासाठी धडक देणार आहेत. यामध्ये राज्यातील शेतकरी व सुकाणू समितीचे सदस्य सहभागी होणार असल्याची माहिती रघुनाथदादा पाटील यांनी दिली. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक श्ािंदे, अ‍ॅड. अजित पाटील, गुणाजी शेलार, आदी उपस्थित होते

Web Title: Farmers' Associations Forum on the Legislative Assembly on Monday: Various organizations of the state will participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.