कोल्हापूर जिल्ह्यात कारवाईनंतरही गौण खजिनाचे उत्खनन सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 06:45 PM2018-10-15T18:45:19+5:302018-10-15T18:51:37+5:30

गेल्या सहा महिन्यांत जिल्हा खनिकर्म विभागाने गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्या ११० ठिकाणी धडक कारवाई केली. त्यामध्ये १ कोटी ३६ लाख १६ हजार ८२० रुपयांचा दंड वसूल करून ९ गुन्हे दाखल केले आहेत तरीही माती, मुरूम व वाळूचे उत्खनन बिनदिक्कत सुरू आहे. खनिकर्म विभागाची ही डोकेदुखी बनली असून ‘झारीतील शुक्राचार्य कोण’ हे शोधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

Even after taking action in Kolhapur district, the excavations of secondary treasures were still going on | कोल्हापूर जिल्ह्यात कारवाईनंतरही गौण खजिनाचे उत्खनन सुरुच

कोल्हापूर जिल्ह्यात कारवाईनंतरही गौण खजिनाचे उत्खनन सुरुच

Next
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात कारवाईनंतरही गौण खजिनाचे उत्खनन सुरुच, सहा महिन्यांत ११० प्रकरणे उघडकीस जिल्हा खनिकर्म विभागाची कारवाई : १ कोटी ३६ लाखांचा दंड वसूल : ९ गुन्हे दाखल

प्रवीण देसाई

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत जिल्हा खनिकर्म विभागाने गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणाऱ्या ११० ठिकाणी धडक कारवाई केली. त्यामध्ये १ कोटी ३६ लाख १६ हजार ८२० रुपयांचा दंड वसूल करून ९ गुन्हे दाखल केले आहेत तरीही माती, मुरूम व वाळूचे उत्खनन बिनदिक्कत सुरू आहे. खनिकर्म विभागाची ही डोकेदुखी बनली असून ‘झारीतील शुक्राचार्य कोण’ हे शोधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

अवैधरीत्या वाळू, मुरूम, माती, दगड, सिलिका, लॅटेराईड अशा गौण खजिनाचे उत्खनन जिल्ह्यात बिनधास्त सुरू आहे. ‘कोण काय करतंय’ अशा मानसिकतेतूनच हे धाडस वाढले आहे. प्रशासनातील स्थानिक पातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वरदहस्तानेच असे प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे; परंतु गेल्या सहा महिन्यांत जिल्हा खनिकर्म विभागाने ११० ठिकाणी धडक कारवाई १ कोटी ३६ लाख १६ हजार ८२० रुपयांचा दंड केला आहे.
त्यापैकी ६० लाख ५२ हजार ७७० रुपये वसूल केला आहे तसेच अवैध उत्खननप्रकरणी ९ गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईमध्ये ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर अशी ३७ वाहनेही जप्त करण्यात आलेली आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही कारवाई मोठी असली तरी अवैध उत्खननाचे प्रकार अद्याप थांबलेली नाहीत. जिल्हा खनिकर्म विभागाकडून थेट कारवाई होत असली तरी हे प्रकार कुणाच्या वरदहस्ताने सुरू आहेत.

हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण आहेत हे शोधून काढण्याचे आव्हानही या विभागासमोर आहे. कारण इतक्या मोठ्या दंडाची कारवाई होऊनही निर्ढावलेल्या लोकांकडून अवैध उत्खननाचे प्रकार बिनधास्त सुरू आहेत. कारवाई करण्यापेक्षा हे प्रकार का सुरू आहेत? याची पाळेमुळे खणून काढण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन व जिल्हा खनिकर्म विभागाची आहे.


अवैधरित्या उत्खनन करून त्याची वाहतूक करणारी ११० प्रकरणे गेल्या सहा महिन्यांत समोर आणत संबंधितांवर कारवाई केली आहे. यामध्ये १ कोटी ३६ लाख १६ हजार ८२० रुपयांचा दंड केला आहे. नव्या शासननिर्णयानुसार मालाच्या पाचपट बाजारभावानुसार दंडाची रक्कम आकाराली जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात फरक पडला आहे, असे असले तरी अजून असे प्रकार सुरूच आहेत.
-अमोल थोरात,
जिल्हा खनिकर्म अधिकारी


१ एप्रिल ते ३१ सप्टेंबर २०१८ कालावधीतील माहिती

गौण खनिज प्रकार        अवैध उत्खनन प्रकरणांची संख्या      आकारण्यात आलेला दंड     वसूल दंड      दाखल गुन्हे
वाळू                                ४९                                                         ६०१८६६०(रुपये)              ३१७७७१०         ५
मुरुम                               २८                                                         २४०११००                        ११००७००          १
माती                               ११                                                          १२७६५६०                         ३७८१६०           ३
दगड                               २०                                                           ३५१३२५०                         ९८८९५०            -
सिलिका / लॅटेराईट           २                                                            ४०७२५०                          ४०७२५०           -
एकूण                           ११०                                                         १३६१६८२०                    ६०५२७७०        ९
 

 

Web Title: Even after taking action in Kolhapur district, the excavations of secondary treasures were still going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.