ऊस तोडणी कामगारांसाठी माथाडी बोर्ड स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 06:09 AM2017-10-24T06:09:42+5:302017-10-24T06:09:53+5:30

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांसाठी माथाडी बोर्ड स्थापन करून त्याची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी सिटूप्रणित महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनने सोमवारी केली.

Establish Mathadi Board for sugarcane workers | ऊस तोडणी कामगारांसाठी माथाडी बोर्ड स्थापन करा

ऊस तोडणी कामगारांसाठी माथाडी बोर्ड स्थापन करा

googlenewsNext

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांसाठी माथाडी बोर्ड स्थापन करून त्याची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी सिटूप्रणित महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनने सोमवारी केली.
संघटनेच्या शिष्टमंडळाने महिला बालकल्याण व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेऊन बोर्डाच्या तरतुदी व अंमलबजावणी संदर्भात चर्चा केली. ‘सिटू’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे आबासाहेब चौगले, बीड जिल्हाध्यक्ष दत्ता डाके, शेतमजूर युनियनचे जनरल सेक्रेटरी बळिराम भुंबे, राज्याध्यक्ष मारोती खंदारे यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रात दहा लाख ऊसतोडणी कामगार असून ते प्रामुख्याने मराठवाड्यातील बीड व इतर जिल्ह्यातील आहेत. या कामगारांना माथाडी बोर्ड लागू करण्यामध्ये राज्य साखर संघाची नकारार्थी भूमिका अडथळा ठरत आहे.

Web Title: Establish Mathadi Board for sugarcane workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.