हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप : डॉक्टरांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 04:11 PM2019-05-21T16:11:35+5:302019-05-21T16:20:24+5:30

कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात चार दिवस दाखल करुनही कोणत्याही प्रकारे उपचार न केल्याने रुग्ण नामदेव पांडुरंग भास्कर (वय ६३, रा. कुडीत्रे, ता. करवीर) यांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असलेचा आरोप करीत त्यांचेवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. जो पर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव पसरला. येथील काही डॉक्टर समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना संतप्त नातेवाईकांनी त्यांना धक्काबुक्की केली. मंगळवारी सकाळी ही घटना घडली.

Due to defamation, the patient's death, and the allegations of relatives: the doctor was shocked | हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप : डॉक्टरांना धक्काबुक्की

कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात नामदेव भास्कर यांचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेचा आरोप करीत शवगृहाच्या बाहेर थांबुन राहिलेले नातेवाईक. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्देहलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप : डॉक्टरांना धक्काबुक्कीगुन्हा दाखल करण्याची मागणी : सीपीआर रुग्णालयातील प्रकार

कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयात चार दिवस दाखल करुनही कोणत्याही प्रकारे उपचार न केल्याने रुग्ण नामदेव पांडुरंग भास्कर (वय ६३, रा. कुडीत्रे, ता. करवीर) यांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असलेचा आरोप करीत त्यांचेवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. जो पर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव पसरला. येथील काही डॉक्टर समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना संतप्त नातेवाईकांनी त्यांना धक्काबुक्की केली. मंगळवारी सकाळी ही घटना घडली.

दरम्यान सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे हे शासकीय कामानिमित्त मुंबईला गेले होते. रुग्णाचे नातेवाईक आणि पीपल्स पिरपिब्लक पार्टीचे जिल्हाध्यक्ष डी. जी. भास्कर यांनी त्यांचेशी फोनवर संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. ते मुंबईहून कोल्हापूरला येण्यासाठी निघाले आहेत. त्यांची भेट घेवून पुढील कार्यवाही झालेनंतरचं मृतदेह ताब्यात घेणार असल्याचे भास्कर यांनी सांगितले. सायंकाळी उशीरापर्यंत मृतदेह शवगृहात ठेवून होता.


नामदेव भास्कर यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. पुन्हा त्यांच्या पायाला गाठ उठल्याने त्यांना १६ मे रोजी रात्री सीपीआर रुग्णालयात दाखल केले. गेली चार दिवस त्यांच्या पोटात अन्न नव्हते. डॉक्टरांनी सलाईनही लावली नाही. फक्त औषधे दिल्याने त्यांची प्रकृत्ती अत्यावस्थ झाली. याठिकाणी चार ते पाच डॉक्टर रुग्णांची तपासणी करण्यासाठी येत असतात.

चार दिवस डॉक्टरांनी त्यांचेकडे दूर्लक्षच केल्याने मंगळवारी सकाळी नामदेव भास्कर यांचा मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती समजताच सीपीआरमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली. डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्याने रुग्ण दगावलेचा आरोप करीत गोंधळ घातला. येथील डॉक्टर गिरीष कांबळे, डॉ. बरगे, डॉ. मेंचू, डॉ. घोरपडे यांनी नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता संतप्त नागरिकांनी शिव्यांची लाखोली वाहत त्यांना धक्काबुक्की केली.

वादावादी वाढल्याने खासगी सुरक्षारक्षकांनी धाव घेत जमावाला पांगवले. सीपीआरच्या शवगृहात मृतदेह ठेवला होता. अधिष्ठाता डॉ. लोकरे यांची भेट घेवूनचं मृतदेह ताब्यात घेणार असल्याचे डी. जी. भास्कर यांनी सांगितले. मृत नामदेव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

नेत्रदानाचा निर्णय

नामदेव भास्कर यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात डॉक्टरांवर आरोप केल्याने वातावरण तापले होते. दूपारी बाराच्या सुमारास नातेवाईकांनी मृत नामदेव यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नेत्रदान केले.
 

 

Web Title: Due to defamation, the patient's death, and the allegations of relatives: the doctor was shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.