प्रबोधनामुळे कोल्हापूरकरांची ‘फटाकेमुक्ती’कडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 08:07 PM2017-10-19T20:07:01+5:302017-10-19T20:17:32+5:30

कोल्हापूर : निसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला आहे.

Due to the awakening, Kolhapurkar's 'Fire-cracking' will move towards | प्रबोधनामुळे कोल्हापूरकरांची ‘फटाकेमुक्ती’कडे वाटचाल

प्रबोधनामुळे कोल्हापूरकरांची ‘फटाकेमुक्ती’कडे वाटचाल

googlenewsNext
ठळक मुद्देफटाके वाजविणे टाळणाºयांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे

कोल्हापूर : निसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. यावर्षी फटाके वाजविणे टाळणाºयांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. पर्यावरणपूरक दिवाळीला कोल्हापूरकरांचा वर्षागणिक प्रतिसाद वाढत आहे.

हवा आणि ध्वनी प्रदूषणात फटाक्यांमुळे भर पडते. त्यामुळे आरोग्य बिघडते. ते टाळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरमध्ये फटाके टाळून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी व्हावी, यासाठी विविध संस्था प्रबोधन करीत आहेत. यातील निसर्गमित्र संस्था फटाके न वाजविणाºया मुलांसाठी निसर्गसहल काढते. त्यासह या संस्थेमार्फत विद्यार्थी हे व्यापाºयांना ‘दीपावली पाडवा व लक्ष्मीपूजनाचा आनंद फटाके न वाजवता मिठाई वाटून साजरा करूया,’ अशा आशयाची पत्रे पाठवितात. महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समिती शालेय विद्यार्थ्यांना संकल्पपत्र पुरवून ‘फटाकेमुक्त दिवाळी’ साजरी करण्याची शपथ देण्याचा उपक्रम राबविते.

शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थी हे फटाके वाजविणे टाळून त्यातून बचत होणाºया पैशांमधून त्यांच्या शाळेतील गरीब मित्र-मैत्रिणीला दिवाळीची कपडे भेट देतात. या संस्थांतर्फे गेल्या १० ते १५ वर्षांपासून हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. काही व्यक्ती या वैयक्तिकपणे फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करतात. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा फटाके वाजविणाºयांचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवत आहे.


पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने कोल्हापूरकरांचे एक चांगले पाऊल या माध्यमातून पडत आहे. शहरातील विविध भागांत दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची निरीक्षणे नोंदविण्याचे काम आमच्या विभागाकडून सुरू आहे. येत्या चार दिवसांत त्याचा अहवाल तयार केला जाईल.
- डॉ. पी. डी. राऊत, पर्यावरण विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ.

 

Web Title: Due to the awakening, Kolhapurkar's 'Fire-cracking' will move towards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.