त्र्यंबोली येथील भक्त निवास खुले करावे, देवी मरगाई व त्र्यंबोली भक्त मंडळाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:24 AM2019-01-19T11:24:16+5:302019-01-19T11:25:35+5:30

त्र्यंबोली टेकडी येथील भक्त निवास भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणी देवी मरगाई व त्र्यंबोली भक्त मंडळाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे केली आहे. ​

The devotee should open the house at Trimboli, Devi Murgaai and Trimboli Bhakta Mandal demand | त्र्यंबोली येथील भक्त निवास खुले करावे, देवी मरगाई व त्र्यंबोली भक्त मंडळाची मागणी

कोल्हापुरातील त्र्यंबोली टेकडी येथील भक्त निवास भाविकांसाठी खुले करावे या मागणीचे निवेदन देवी मरगाई व त्र्यंबोली भक्त मंडळाने देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना दिले.

Next
ठळक मुद्देत्र्यंबोली येथील भक्त निवास खुले करावेदेवी मरगाई व त्र्यंबोली भक्त मंडळाची मागणी

कोल्हापूर : त्र्यंबोली टेकडी येथील भक्त निवास भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणी देवी मरगाई व त्र्यंबोली भक्त मंडळाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे केली आहे.

समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्र्यंबोली देवीच्या मंदिरामागे आमदार सतेज पाटील यांच्या आमदार फंडातून भक्त निवास बांधण्यात आले आहे. मात्र बांधल्यापासून हे भक्त निवास बंद अवस्थेत आहे. येथे देवस्थान समितीने गोदाम केले आहे.

आता समितीचे कार्यालय येथे स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र देवीला आलेल्या भाविकांना नैवेद्य उघड्यावर करावा लागतो. जेवणासाठीही परिसरातच बसावे लागते. याचा विचार करून येथे समितीचे कार्यालय न करता हे भक्त निवास भाविकांसाठी खुले करण्यात यावे. अन्यथा समितीविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी मंडळाचे महादेव पाटील, मोहन पाटील, महादेव जाधव, रवी कांबळे, लहू शिंदे, प्रकाश हिरेमठ, किशोर घाटगे, राजाराम सुतार, रियाज कागदी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
 

 

Web Title: The devotee should open the house at Trimboli, Devi Murgaai and Trimboli Bhakta Mandal demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.