कुंभोजमध्ये दारूबंदीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:35 AM2017-08-18T00:35:22+5:302017-08-18T00:35:22+5:30

Determination of alcoholism in Kumbhojo | कुंभोजमध्ये दारूबंदीचा निर्धार

कुंभोजमध्ये दारूबंदीचा निर्धार

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभोज : स्वातंत्र्यदिनी कुंभोज (ता. हातकणंगले) येथे ग्रामसभेदरम्यान बैठकीच्या नियोजनाचा अभाव, तसेच महिला सदस्यांच्या सभास्थानाच्या अनुपस्थितीमुळे सभेला गोंधळाचे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी, गावात उभी बाटली आडवी करण्यासाठी दारूबंदी लढ्यातील उपस्थित अग्रणी महिलांसह नागरिकांतून कमालीची नाराजी व्यक्त झाली. सभेदरम्यान गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा एकमुखी निर्धार करून मतदान घेण्याचा ठरावही करण्यात आला. या विषयावरील चर्चेवेळी सरपंचांची अनुपस्थिती मात्र उपस्थितांना खटकली.
महिन्याभरापासून गावात दारूबंदी लढ्याची मशाल हाती घेतलेल्या महिलांनी १५ आॅगस्टला होणाºया ग्रामसभेत गावात संपूर्ण दारूबंदी करण्याबाबतची ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर लढ्यातील रणरागिनी तसेच लढ्यास समर्थन देणाºया नागरिकांची उपस्थिती मोठी होती.
ग्रामपंचायतीत महिला सदस्यांचे संख्याबळ आठ आहे. ग्रामपंचायतीत महिलाराज असल्याने उभी बाटली आडवी करण्याच्या ठरावासह पाठबळ मिळविण्याच्या उद्देशाने दारूबंदी लढ्यातील कार्यकर्त्यांची सभेस कधी नव्हे इतकी उपस्थिती होती. तथापि, गोंधळाच्या कारणावरून सरपंच सभा पूर्ण होईपर्यंत सभास्थानी थांबल्या नाहीत. याशिवाय महिला सदस्यांची सभा ठिकाणी राहिलेल्या अनुपस्थितीमुळे नागरिकांत उघडपणे नाराजी व्यक्त झाल्याने या कारणावरून बराच वेळ गोंधळ उडाला.
बैठकीच्या ठिकाणाबरोबरच सभा चालविण्यातही नियोजनाचा अभाव राहिल्याने ग्रामसभेत वारंवार गोंधळ माजला. शिवाय प्रश्न अथवा सूचना मांडणाºया नागरिकांनी शिस्त न पाळल्यानेही गोंधळात अधिकच भर पडली. आयत्यावेळी उपस्थित झालेल्या वैयक्तिक पातळीवरील प्रश्नांमुळे ग्रा. पं. पदाधिकारी हैराण बनले. अशा वातावरणात माजी सरपंच किरण नामे, कमल सुवासे यांनी दारूबंदीबाबत कृती समिती गठीत करण्याची मागणी केली. सभेदरम्यान उभी बाटली आडवी करणे, तसेच त्याबाबत पाठपुरावा करण्याचा अधिकार कृती समितीला देणे, पाणंद रस्त्यांची डागडुजी करणे, शाहूनगर, शिवाजीनगर येथील अतिक्रमणे कायम करणे, रयत गुरुकुल शाळेमागील पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटविणे, स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटविणे, आदी ठराव सभेदरम्यान करण्यात आले.
सभेस उपसरपंच अभिजित जाधव, ग्रा. पं. सदस्य कलगोंडा पाटील, सुकुमार पाटील, जहाँगीर हजरत, विपुल चौगुले, सागर कांदेकर, सप्रेम मासुर्ले, नंदकुमार माळी, अनिल कोरे, अजित गोपुडगे, ग्रामविकास अधिकारी आर. सी. पाटील, विजय नामे, भारत जमणे, दारूबंदी लढ्यातील कमल सुवासे, रूपाली घाटगे, शोभा सनदे, मीना सकटे, सुमन भोरे, सागर सुवासे, अविनाश घाटगे, विशाल घाटगे, विशाल लोंढे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Determination of alcoholism in Kumbhojo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.