कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ४९ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:22 PM2019-07-19T12:22:37+5:302019-07-19T12:24:08+5:30

डेंग्यूला प्रतिबंध करण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाची जनजागृती सुरू असतानाही नागरिक योग्य प्रकारे खबरदारी घेत नसल्याचे डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहिमेतून स्पष्ट होत आहे. गुरुवारी केलेल्या मोहिमेत ४१६ घरांपैकी ४९ ठिकाणी पाण्याच्या कंटेनरमधून डेंग्यूच्या अळ्या आढळून आलेल्या आहेत.

Dengue larvae in 49 places in Kolhapur municipal work area; | कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ४९ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या

कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ४९ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या

Next
ठळक मुद्देकोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ४९ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्याडेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबविण्याकरिता आदेश

कोल्हापूर : डेंग्यूला प्रतिबंध करण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाची जनजागृती सुरू असतानाही नागरिक योग्य प्रकारे खबरदारी घेत नसल्याचे डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहिमेतून स्पष्ट होत आहे. गुरुवारी केलेल्या मोहिमेत ४१६ घरांपैकी ४९ ठिकाणी पाण्याच्या कंटेनरमधून डेंग्यूच्या अळ्या आढळून आलेल्या आहेत.

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबविण्याकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आदेश दिले आहेत. या आदेशास अनुसरून गुरुवारी शहरातील शाहूपुरी सहावी गल्ली, सुतारवाडा परिसर, न्यू शाहूपुरी पर्ल हॉटेलच्या मागे, कनाननगर परिसर, बालेकिल्ला परिसर, मोरे कॉलनी, दत्त चिलेनगर, तपोवन परिसर, इत्यादी ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य, नागरी कुटुंबकल्याण केंद्र (दवाखाना) तसेच जिल्हा हिवताप विभाग यांच्यामार्फत संयुक्तपणे डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबविण्यात आली. सदरच्या मोहिमेअंतर्गत ४१६ कुटुंबे व ९०९ कंटेनरचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांपैकी ४९ कंटेनरमध्ये डासअळ्या आढळून आलेल्या आहेत.

सदरच्या मोहिमेत आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, आरोग्य विभागाचे २३ कर्मचारी, नागरी कुटुंब कल्याण केंद्र व जिल्हा हिवताप विभागाचे १६ अधिकारी, कर्मचारी, सर्व आरोग्य निरीक्षक, विभागीय आरोग्य निरीक्षक, आदींनी भाग घेतला.

गेल्या वर्षापासून शहराच्या हद्दीत डेंग्यूचा प्रादुर्भाव निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत महापालिकेतर्फे जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या तीन विभागांचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहितीपत्रके वाटण्याबरोबरच घरातील पाण्याचे कंटेनर तपासत आहेत. नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याची बाब या मोहिमेतून पुढे आली आहे.

Web Title: Dengue larvae in 49 places in Kolhapur municipal work area;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.