‘बिद्री’तुन लबाडांची टोळी हटवा : प्रकाश आबिटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 09:05 PM2017-09-23T21:05:23+5:302017-09-23T21:05:23+5:30

पांगिरे : बिद्री साखर कारखाना हा चार तालुक्यातील शेतकºयांच्या कष्टातुन उभा राहिला आहे.

Delete the gang of robbers from 'Bidri': Light Abitkar | ‘बिद्री’तुन लबाडांची टोळी हटवा : प्रकाश आबिटकर

‘बिद्री’तुन लबाडांची टोळी हटवा : प्रकाश आबिटकर

Next

पांगिरे : बिद्री साखर कारखाना हा चार तालुक्यातील शेतकºयांच्या कष्टातुन उभा राहिला आहे. या कारखान्यावर दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ असताना पारदर्शक कारभार झाला. मात्र गेल्या दहा वर्षात हसन मुश्रीफ, के.पी पाटील या हसन - किसन कंपनीने स्व:हित साधण्यासाठी कारखान्याची लुट केली आहे. ही लुटारुंची टोळी हटवा असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते पांगिरे (ता.भुदरगड) येथे बिद्री कारखान्याच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच राजाराम महादेव भराडे हे होते .
आमदार आबिटकर म्हणाले, बँक आणि भु--विकास बँक बुडवणारे नेते आपल्यावर आरोप करीत आहेत. ज्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या संस्था मोडीत काढल्या, पै पाहुण्याना सभासद केले त्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. के.पी पाटील यांनी केवळ सहवीज प्रकल्पाचा डांगोरा पिटला आहे. सहवीज प्रकल्प झाल्यानंतर टनाला २००रुपये वाढीव दर मिळेल अशी खोटी स्वप्ने दाखवून शेतकºयांची दिशाभुल केली आहे .
यावेळी माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव ,माजी संचालक के.जी नांदेकर, राधानगरीचे विजयसिह मोरे ,काँग्रेस भुदरगड तालुका अध्यक्ष शामराव देसाई ,शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील,नंदकुमार सुर्यवंशी,माजी सभापती पांडुरंग पाटील ,गोकुळचे माजी संचालक दिनकर कांबळे , शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक पाटील ,उपसरपंच सौ.वैशाली पाटील ,सौ.इंदुबाई भराडे,नामदेव गडकरी ,तानाजी घोटणे,मारूती भराडे,धोंडीराम पाटील ,पांडुरंग घोटणे,गोपाळ पाटील ,दत्तात्रय भाटले,सात्ताप्पा सुतार ,नागेश पाटील आदि उपस्थित होते .यावेळी प्रास्तविक तानाजी घोटणे यानी व आभार राजाराम भराडे यानी मानले.
23 पांगिर सभा : पांगिरे( ता.भुदरगड)कार्यकर्त्यांचा मेळाव्यात आमदार प्रकाशराव आबिटकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी दिनकरराव जाधव,विजयसिह मोरे ,शामराव देसाई आदी उपस्थित होते.

 

Web Title: Delete the gang of robbers from 'Bidri': Light Abitkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.