‘अंबाबाई’ आराखड्यावर हिवाळी अधिवेशनात निर्णय : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:40 AM2017-11-25T00:40:33+5:302017-11-25T00:42:14+5:30

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यावर नागपूरमध्ये होणाºया हिवाळी अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे.

 Decision in the Winter Session on 'Ambabai' Plan: Chief Minister's Guilty | ‘अंबाबाई’ आराखड्यावर हिवाळी अधिवेशनात निर्णय : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

‘अंबाबाई’ आराखड्यावर हिवाळी अधिवेशनात निर्णय : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Next
ठळक मुद्दे६८ कोटींच्या निधीची मागणी भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करता येतील-महेश जाधव

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यावर नागपूरमध्ये होणाºया हिवाळी अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे विकास आराखड्याचा विषय मार्गी लागावा, अशी मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान यावर बैठक लावू, अशी ग्वाही दिली.

अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांचा ओघ वाढत असून त्यांना मूलभूत सोयी-सुविधांसह अनेक कारणांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर विकास आराखडा तातडीने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, आराखडा अद्यापही मुख्यमंत्र्यांसमोर सादर झाला नसल्याने महापालिका आणि देवस्थान समितीचेही हात बांधले गेले आहेत. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आराखड्याचा मुद्दा उपस्थित केला व ६८ कोटींचा निधी कामांसाठी वर्ग व्हावा, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान महापालिका व देवस्थानच्या पदाधिकाºयांसह बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली.

अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या मंजुरीचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. त्यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात आराखड्याचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. आराखड्यावर निर्णय होऊन निधी वर्ग झाला तर भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करता येतील.
महेश जाधव
(अध्यक्ष, प. म. देवस्थान व्यवस्थापन समिती)

Web Title:  Decision in the Winter Session on 'Ambabai' Plan: Chief Minister's Guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.