विक्रमसिंह घाटगे यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय-- समरजितसिंह घाटगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:32 AM2017-09-23T00:32:24+5:302017-09-23T00:32:24+5:30

कागल : श्री छत्रपती शाहू ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांचा पुतळा छ. शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर लवकरच उभारण्याची आणि हा पुतळा कसा असावा, कोठे आणि केव्हा उभा करावा?

 Decision to set up Statue of Vikramsinh Ghatge - Samarjit Singh Ghatge | विक्रमसिंह घाटगे यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय-- समरजितसिंह घाटगे

विक्रमसिंह घाटगे यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय-- समरजितसिंह घाटगे

Next
ठळक मुद्देशाहू कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : श्री छत्रपती शाहू ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांचा पुतळा छ. शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर लवकरच उभारण्याची आणि हा पुतळा कसा असावा, कोठे आणि केव्हा उभा करावा? याचे नियोजन करण्यासाठी विक्रमसिंहराजेंच्या समवेत काम केलेल्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांची समितीही नेमण्याची घोषणा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली.
छ. शाहू सहकारी साखर कारखान्याची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. सभासदांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीला प्रतिसाद देत घाटगे यांनी ही घोषणा केली. ज्येष्ठ संचालिका सुहासिनीदेवी घाटगे, माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्यासह सर्व संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. गत गळीत हंगामातील उसाला अंतिम दराची रुपये १२५ प्रमाणे प्रतिटन रक्कम दीपावलीपूर्वी देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
घाटगे म्हणाले, निव्वळ पुतळा उभारण्याऐवजी राजेंच्या विचारांचे जिवंत स्मारक उभे राहिले पाहिजे. यासाठी त्यांच्या नावाने फौंडेशन सुरू करून विविध समाजोपयोगी उपक्रम सध्या सुरू आहेत. राजेसाहेबांचा पुतळा उभारण्याचे नियोजन करण्याचा नैतिक अधिकार माझ्यापेक्षा त्यांच्यासमवेत काम केलेल्या ज्येष्ठांनाच आहे.
साखर कारखान्याचे विस्तारीकरण पूर्ण होत असून, प्रतिटन सात हजार मे. टन गाळप क्षमता झाली आहे. एकूण पाच नव्या मिल बसविल्या आहेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे.

ऊस विकासाबद्दल देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कारखान्यास मिळाल्याबद्दल सभासदांच्या हस्ते समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल कार्यकारी संचालक विजय औताडे यांचा घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी स्वागत केले. विषयपत्रिकेचे वाचन विजय औताडे, प्रश्नोत्तरांचे वाचन एस. ए. कांबळे, तर संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.

महाराष्टÑातील पहिला सोलर प्रोजेक्ट
समरजितसिंह म्हणाले, कारखान्याने सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसवून ठिबक सिंचन योजना करणाºया शेतकºयांसाठी २० हजारांपासून ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देणारी योजना आणली आहे. शेंडूर येथील उपसा जलसिंचन संस्थेसाठी शासनाने राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर केला आहे. हा प्रकल्पही शाहू साखरच्या माध्यमातून होत आहे.
महिला सभासदांसाठी स्वतंत्र योजना ,शाहू साखर कारखान्याने ठिबक सिंचन योजना,
नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती अशा विविध उपक्रमांची सुरुवात केली आहे. श्रीमंत विजयादेवी महिला ठिबक सिंचन योजनेद्वारे महिला ऊस उत्पादकांना प्रोत्साहित केले आहे. महिला सभासद शेतकºयांसाठीच्या या
योजना सुहासिनीदेवी घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली आहेत.

Web Title:  Decision to set up Statue of Vikramsinh Ghatge - Samarjit Singh Ghatge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.