डी. वाय. दादांचा राष्ट्रवादी प्रवेश आमच्यासाठी अनपेक्षित; सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:20 AM2018-12-24T00:20:43+5:302018-12-24T00:21:27+5:30

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा आमच्यासाठी अनपेक्षित असा आहे. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी अनेक लोकांशी ...

D. Y NCP's entry to the beads is unexpected for us; Satej Patil | डी. वाय. दादांचा राष्ट्रवादी प्रवेश आमच्यासाठी अनपेक्षित; सतेज पाटील

डी. वाय. दादांचा राष्ट्रवादी प्रवेश आमच्यासाठी अनपेक्षित; सतेज पाटील

Next

कोल्हापूर: डॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा आमच्यासाठी अनपेक्षित असा आहे. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी अनेक लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांच्या वयाचा व तब्येतीचा विचार करता त्यांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावे, हे अपेक्षित नाही. कुटुंब म्हणून आमच्या सर्वांसाठी हा निर्णय आश्चर्यकारक आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
दादांच्या या निर्णयाची आम्हाला कल्पना नव्हती. एवढी वर्षे राजकीय, सामाजिक जीवनात कार्यरत असल्याने दादा अजूनही बरेचसे निर्णय स्वत:च्या पातळीवर घेतात; पण हा निर्णय होत असताना राष्ट्रवादीने आमच्या कुटुंबातील लोकांच्या कानावर हा विषय घालणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही याचे वाईट वाटते, या शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीच्या या भूमिकेविषयी नाराजीही व्यक्त केली.
दरम्यान, काँग्रेस पक्षवाढीसाठी मी आजपर्यंत जोमाने काम केले आहे. भविष्यातही मी तितक्याच जोमाने कार्यरत राहणार असल्याचे सांगत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Web Title: D. Y NCP's entry to the beads is unexpected for us; Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.