विमानतळ विकास श्रेयवादावरून टीका; शासकीय शिष्टाचार पाळला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:21 AM2018-10-12T00:21:19+5:302018-10-12T00:24:55+5:30

एकच खासदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावून शासकीय शिष्टाचाराचे पालन न करता विमानतळाच्या विस्तारित धावपट्टीचा भूमिपूजन समारंभ घाईगडबडीत उरकून घेतल्याची टीका खासदार संभाजीराजे यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता गुरुवारी केली.

Criticism from airport development creditworthiness; There is no official protocol | विमानतळ विकास श्रेयवादावरून टीका; शासकीय शिष्टाचार पाळला नाही

विमानतळ विकास श्रेयवादावरून टीका; शासकीय शिष्टाचार पाळला नाही

googlenewsNext
ठळक मुद्देभूमिपूजनास फक्त महाडिक कुटुंबीयच कसे?संभाजीराजे यांची विचारणा मंत्र्यांच्या कार्यालयात बोलावून तोडगा काढण्याची विनंती केली. तेव्हा मला एकट्यालाच श्रेय घेता आले असते; परंतु

कोल्हापूर : एकच खासदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावून शासकीय शिष्टाचाराचे पालन न करता विमानतळाच्या विस्तारित धावपट्टीचा भूमिपूजन समारंभ घाईगडबडीत उरकून घेतल्याची टीका खासदार संभाजीराजे यांनी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता गुरुवारी केली. या कार्यक्रमात सरकारी अधिकाऱ्यांनी राज शिष्टाचाराचेही पालन करण्याचे औचित्य दाखविले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

रखडलेल्या विमानतळाच्या धावपट्टीचे ९३० मीटर विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन बुधवारी झाले. सुमारे ८० कोटींचे हे काम आहे. खासदार महाडिक, आमदार अमल महाडिक व विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. त्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करणारे पत्रक संभाजीराजे यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिले. त्यात ते म्हणतात, ‘विमानतळ विस्तारीकरण करणे आणि नियमित विमानसेवेसाठी पालकमंत्री चंद्रकात पाटील, खासदार राजू शेट्टी यांच्यासह माझेही प्रयत्न महत्त्वाचे असताना कोणतीही कल्पना न देता विस्तारीकरणाचा भूमिपूजन कार्यक्रम घाईगडबडीत उरकण्यात आला.

शासकीय राजशिष्टाचारानुसार महत्त्वाच्या योजनेचा प्रारंभ करताना जिल्ह्यातील खासदार, आमदार व संबंधित मंत्री, पालकमंत्री यांना निमंत्रण देणे आवश्यक असते. खासदार म्हणून मी विमानसेवा, विमानतळ विस्तारीकरणासाठी केलेले प्रयत्न जिल्ह्याला माहीत आहेत. यापूर्वी लोकप्रतिनिधी, अनेक संस्था, उद्योजकांनी विमानतळासाठी आवाज उठविला आहे. त्यामुळे विमानसेवा सुरू होण्याबरोबरच विमानतळ विस्तारीकरण करण्यात येत आहे; परंतु यामधील कोणालाही पूर्वकल्पना न देता विमानतळ विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन शासनाचे अधिकारी कसे काय घेऊ शकतात? ते शासनाचे अधिकारी आहेत, की एकाच खासदारांचे हे त्यांनी स्पष्ट करावे.

मी केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू यांना सर्वप्रथम भेटलो, तेव्हा कोल्हापूर विमानतळाच्या स्थितीबाबत चर्चा केली. मला खासदार बनून एक महिनाही उलटला नव्हता. महिन्याभरात दुसºयांदा भेट घेऊन (२९ आॅगस्ट २०१६) विमानतळाच्या अडचणीचे विस्तृत पत्र त्यांना दिले. त्यानुसार पुढे बैठका आणि परवानग्या मिळायला सुरुवात झाली. मी महाराष्ट्रातील संबंधित मंत्री, संबंधित सर्व खासदार आणि अधिकारी यांना मंत्र्यांच्या कार्यालयात बोलावून तोडगा काढण्याची विनंती केली. तेव्हा मला एकट्यालाच श्रेय घेता आले असते; परंतु मी श्रेयवादाचे राजकारण केले नाही. उलट जिल्ह्यातील सर्व खासदारांना बोलवा, असा आग्रह मी धरला होता.


ही तर शोकांतिकाच..
एखाद्या कामाचे श्रेय एकट्यालाच मिळावे, यासाठी शासकीय अधिकाºयांना हाताशी धरून अशा प्रकारचे भूमिपूजन करणे म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणातील शोकांतिका म्हणावी लागेल, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
मला प्रसिद्धीची कला अवगत नाही..

आम्हाला फक्त श्रेय घ्यायची किंवा प्रसिद्धीची कला अवगत नाही म्हणा, अथवा त्याची आवश्यकताही नाही, अशी आमची भावना आहे. मला याचे वाईट वाटते की, राजर्षी शाहूंच्या कार्यकर्तृत्वाने ओळखल्या जाणाºया या विकासनगरीला दिवसेंदिवस खालावत चाललेल्या स्थानिक राजकारणाचा फटका बसू नये, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Criticism from airport development creditworthiness; There is no official protocol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.