ठळक मुद्देप्रसिद्ध तबलावादक संजय साळोखे यांना अर्थसहाय्य प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्यावतीने कलाकारांप्रती कृतज्ञतेची भावना

कोल्हापूर ,दि.  ०६ : मराठी रंगभूमी दिनाचा एक दिवसाचा सोहळा साजरा करण्याऐवजी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेने प्रसिद्ध तबलावादक संजय साळोखे यांना अर्थसहाय्य करून कलाकारांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. यावेळी कलाकारांची सेवा करण्याची संधी नेहमी मिळत राहो असे साकडे नटराजाला घालण्यात आले.


संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात सुधीर अल्गौडर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रंगमंचाचे पूजन करण्यात आले. एकेकाळी आपल्या तबलावादनाने कोल्हापूरसह महाराष्ट्रतील अनेक मैफिली गाजवणारे संजय साळोखे यांच्या पायातील बळ गेल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सध्या ते आधाराशिवाय कुठेही जावू शकत नाहीत. त्यांच्या उपचारासाठी प्रतिज्ञा नाट्यरंगच्यावतीने मिलिंद अष्टेकर यांच्या हस्ते त्यांना धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी प्रतिज्ञा नाट्यरंगचे प्रशांत जोशी, सतिश साळोखे, रमेश सुतार, सागर भोेसले, रमेश कांबळे, अ‍ॅन्थोनी डिसोजा, नाना बोरगावकर उपस्थित होते.