Lok Sabha Election 2019 : खुर्च्या मोजण्यापेक्षा स्वत:च्या चार जागांवर लक्ष द्यावे : गिरीष महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 07:14 PM2019-03-24T19:14:55+5:302019-03-24T19:23:28+5:30

खुर्च्या मोजण्याचे काम त्यांचे नाही, ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आमच्या खुर्च्या मोजण्यापेक्षा स्वत:च्या चार जागा निवडून आणण्यावर लक्ष द्यावे, अशा शब्दात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना प्रत्त्युत्तर दिले.

Consider four places of your own, instead of measuring the chairs: Girish Mahajan | Lok Sabha Election 2019 : खुर्च्या मोजण्यापेक्षा स्वत:च्या चार जागांवर लक्ष द्यावे : गिरीष महाजन

Lok Sabha Election 2019 : खुर्च्या मोजण्यापेक्षा स्वत:च्या चार जागांवर लक्ष द्यावे : गिरीष महाजन

Next
ठळक मुद्देखुर्च्या मोजण्यापेक्षा स्वत:च्या चार जागांवर लक्ष द्यावे : गिरीष महाजन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सर्व काही तिढे

कोल्हापूर : खुर्च्या मोजण्याचे काम त्यांचे नाही, ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आमच्या खुर्च्या मोजण्यापेक्षा स्वत:च्या चार जागा निवडून आणण्यावर लक्ष द्यावे, अशा शब्दात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना प्रत्त्युत्तर दिले.

युतीच्या प्रचार प्रारंभाच्या सभेनिमित्त मंत्री महाजन कोल्हापुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री महाजन म्हणाले, भाजप-शिवसेना युतीमध्ये कोणतेही तिढे नाहीत. सर्व काही तिढे काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षच राजीनामा देण्याच्या तयारी आहेत. आमचे सर्व नियोजन पक्के आहे. त्यामुळे गेल्या वर्षी पेक्षा भाजप-शिवसेना युतीच्या निश्चितपणे जादा जागा निवडून येतील. माढा मतदार संघातील आमचा उमेदवार येत्या दोन दिवसांत निश्चित होईल. याठिकाणी आमचाच उमेदवार निवडून येईल.

निवडणुकीनंतर अनेकजण येणार

काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक मोठ्या नेत्यांना भविष्याचे वेध लागले आहेत. त्यांना माहित आहे की, देशात भाजप-सेनेचे सरकार पुन्हा येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत. त्यामुळे हे नेते आम्हाला आता मदत करत असून निवडणुकीनंतर ते भाजपमध्ये येणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.
 

 

Web Title: Consider four places of your own, instead of measuring the chairs: Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.