पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खारफुटीचे संरक्षण अत्यावश्यक-ए. जी. उंटावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:44 PM2019-04-13T13:44:31+5:302019-04-13T13:45:18+5:30

जागतिक पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खारफुटीचे संरक्षण व संवर्धन ही अत्यावश्यक बाब आहे. तसे न झाल्यास मानवी अस्तित्वासाठी ते मारक ठरणार आहे, असे

For the conservation of the ecosystem, the protection of mangroves is essential. G. Bustle | पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खारफुटीचे संरक्षण अत्यावश्यक-ए. जी. उंटावळे

 शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. ए. जी. उंटावळे आणि डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून व्ही. डी. जाधव, एन. एस. चव्हाण, डी. के. गायकवाड, एस. एस. कांबळे उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देवनस्पतीशास्त्र विभागातील राष्ट्रीय परिषद

कोल्हापूर : जागतिक पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खारफुटीचे संरक्षण व संवर्धन ही अत्यावश्यक बाब आहे. तसे न झाल्यास मानवी अस्तित्वासाठी ते मारक ठरणार आहे, असे प्रतिपादन मॅनग्रोव्हज् सोसायटी आॅफ इंडियाचे कार्यकारी सचिव डॉ. ए. जी. उंटावळे यांनी शुक्रवारी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. निलांबरी सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. ‘मॅनग्रोव्हज अँड कोस्टल रिसोर्सेस’ असा परिषदेचा विषय आहे. डॉ. उंटावळे म्हणाले, पर्यावरणाच्या दृष्टीने खारफुटीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ सागरी जल पर्यावरणाबरोबरच इतर पर्यावरणाच्या दृष्टीनेही त्याचे मोठे महत्त्व आहे. निसर्गातील अतिरिक्तकार्बन शोषून घेण्याची अन्य वनस्पतींच्या तुलनेत खारफुटीची क्षमता अधिक असते. सागराला जमिनीवर अतिक्रमणापासून रोखणारी ती नैसर्गिक भिंत आहे. पायाभूत सुविधा निर्माणाच्या नावाखाली खारफुटीचा होत असलेला ºहास अंतिमत: मानवी अस्तित्वाच्याच मुळावर येण्याची शक्यता आहे; त्यामुळे खारफुटीचे संरक्षण व संवर्धन यासाठी शासकीय, शैक्षणिक, संशोधकीय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या स्तरांवरही प्रयत्न व जनजागृतीची गरज आहे.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, खारफुटीच्या प्रश्नासंदर्भात शिवाजी विद्यापीठाने केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही मोठे योगदान दिले आहे. विद्यापीठाच्या संशोधकांनी संशोधन, जनजागृतीसाठी काम केले आहे. 
या कार्यक्रमात परिषदेची स्मरणिका आणि ‘मंगलवन’ या विशेषांकाचे प्रकाशन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. एन. एस. चव्हाण यांना खारफुटीसंदर्भातील संशोधनाबद्दल ‘फेलोशिप आॅफ मॅनग्रोव्हज सोसायटी आॅफ इंडिया’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. एस. आर. यादव, जी. बी. दीक्षित, एन. बी. गायकवाड, आदी उपस्थित होते. अधिविभागप्रमुख डॉ. डी. के. गायकवाड यांनी स्वागत केले. डॉ. एस. एस. कांबळे यांनी आभार मानले. 

 

 

Web Title: For the conservation of the ecosystem, the protection of mangroves is essential. G. Bustle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.