Congress's Mahanakshad Rath Yatra from Kolhapur | काँग्रेसची जनसंवाद रथयात्रा कोल्हापुरातून

कोल्हापूर : केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार हे गेली तीन वर्षे ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत जनतेची फसवणूक करीत आहेत. त्याविरोधात कॉँग्रेसने राज्यव्यापी जनसंवाद रथयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात १० जानेवारीला कोल्हापूर जिल्ह्यातून होईल, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपा सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. हे सरकार शेतकºयांचा सात-बारा कोरा तसेच कर्जमाफी करू शकलेले नाही. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळातील अनेक मंत्री घोटाळ्यात अडकले आहेत. याविरोधात कॉँग्रेसने नागपूर हिवाळी अधिवेशनावर जनआक्रोश मोर्चा काढला, परंतु या बधिर सरकारला फरक पडलेला नाही. त्यामुळे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून सरकारविरोधात रणशिंग फुंकण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.