Lok Sabha Election 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अवस्था पंक्चर टायर सारखी : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 09:10 PM2019-03-24T21:10:33+5:302019-03-24T21:16:57+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांमध्ये आता कोणी शिल्लक राहिले नाही. जागा वाटपवारुन त्यांच्यामध्ये वाद सुरू आहे. गिरीश महाजन दिसले की, विरोधकांना धडकी भरते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अवस्था पंक्चर असलेल्या टायर सारखी झाली आहे. आम्ही मांडलेले प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले आहेत, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे केले.

Congress-NCP alliance stage like tactical tire: Uddhav Thackeray | Lok Sabha Election 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अवस्था पंक्चर टायर सारखी : उद्धव ठाकरे

Lok Sabha Election 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अवस्था पंक्चर टायर सारखी : उद्धव ठाकरे

Next
ठळक मुद्देकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अवस्था पंक्चर टायर सारखी : उद्धव ठाकरे विरोधकांमध्ये आता कोणी शिल्लक नाही

कोल्हापूर :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांमध्ये आता कोणी शिल्लक राहिले नाही. जागा वाटपवारुन त्यांच्यामध्ये वाद सुरू आहे. गिरीश महाजन दिसले की, विरोधकांना धडकी भरते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अवस्था पंक्चर असलेल्या टायर सारखी झाली आहे. आम्ही मांडलेले प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले आहेत, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे केले.

 





कोल्हापूरमधील तपोवन मैदानावर भाजप-शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रारंभ सभेमध्ये ते बोलत होते. गरीब जनतेच्या भल्यासाठी भाजप-शिवसेना युतीला सत्ता हवी आहे. अंबाबाईच्या नगरीत नतमस्तक होवून सांगतो की, तुमचे आशिर्वाद हेच आमचे भांडवल आहे. तुमच्या विश्वासाला तडा जावून देणार नाही इतकेच वचन मी तुम्हाला देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तर निवडणूक कशाला लढविता

पाकिस्तानात खेळाडू पंतप्रधान झाला, इकडे पंतप्रधानांची स्वप्न पाहणारा क्रिकेट बोर्डावर. सरकार जर तुमच्या सल्ल्याने चालत असेल, तर निवडणूक कशाला लढविता, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.

नरेंद्र पाटील यांचा सेनेत प्रवेश

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यावर माथाडी नेत्याला खासदार बनविणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
 

 

Web Title: Congress-NCP alliance stage like tactical tire: Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.