कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुल परिसरात स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 06:11 PM2019-07-06T18:11:53+5:302019-07-06T18:13:10+5:30

महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विभागीय क्रीडा संकुल, रेसकोर्स नाका येथे स्वच्छ, सुंदर, हरित कोल्हापूर संकल्पनेतून स्वच्छता अभियान व वृक्षरोपण कार्यक्रम आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत

  Cleanliness in Kolhapur Divisional Sports Complex | कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुल परिसरात स्वच्छता

कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यममाने विभागीय क्रीडा संकुल परिसरात शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी विविध खेळाडूंनीही मोहिमेत भाग घेतला. 

googlenewsNext
ठळक मुद्दे क्रीडा संघटना, खेळाडूंचा सहभाग

कोल्हापूर : महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विभागीय क्रीडा संकुल, रेसकोर्स नाका येथे स्वच्छ, सुंदर, हरित कोल्हापूर संकल्पनेतून स्वच्छता अभियान व वृक्षरोपण कार्यक्रम आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी परिसराची स्वच्छता करण्यात आली. याठिकाणी असलेले प्लास्टिक व कचरा गोळा करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

यावेळी उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, नगरसेवक संतोष गायकवाड, अश्विनी बारामते, किरण नकाते, क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे, विकास माने, सुधाकर जमादार, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, क्रीडा मार्गदर्शक उदय पवार, प्रवीण कोंढावले, कृष्णात पाटील, कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे प्रदीप साळोखे, सुनील पवार, क्रिकेट असोसिएशनचे बाळ पाटणकर, सागर जाधव, सामाजिक कार्यकर्ते उदय गायकवाड, अरुण बारामते, युवराज गायकवाड, जिल्हा हॉकी असोसिएशनचे खेळाडू, महाराष्ट्र हायस्कुलचे फुटबॉल खेळाडू, कुस्तीपटू, विविध क्रीडा कोचेस, तसेच भागातील नागरिक, क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

 

Web Title:   Cleanliness in Kolhapur Divisional Sports Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.