नागरिकांशी गैरवर्तन; सहा पोलिसांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:44 AM2017-12-30T00:44:42+5:302017-12-30T00:45:33+5:30

Citizens Abuse; Notice to six policemen | नागरिकांशी गैरवर्तन; सहा पोलिसांना नोटिसा

नागरिकांशी गैरवर्तन; सहा पोलिसांना नोटिसा

Next


कोल्हापूर : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाºया सामान्य नागरिकाला चांगली वागणूक न देता त्यांच्याशी उद्धट भाषा वापरल्याप्रकरणी सहा पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठविली आहे. यापुढे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व कर्मचाºयांकडून नागरिकांना सन्मानाची वागणूक न मिळाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी अधिकाºयांना दिला.
पोलीस मुख्यालयात शुक्रवारी क्राईम बैठक घेण्यात आली. यावेळी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कामकाजांचा लेखा-जोखा मांडण्यात आला. पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यानुसार मोहिते यांनी अधिकाºयांना चांगलेच सुनावले. ‘तक्रार कसलीही असो व व्यक्ती कोणीही असो त्याला पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली पाहिजे. पोलीस ही लोकांसाठी अस्तित्वात आलेली यंत्रणा आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या पातळीवरच तक्रारींची गांभीर्याने दखल घेतल्यास अनेक प्रश्न निकाली निघू शकतात. सामान्यातील सामान्य माणसाला, वृद्ध, महिला, लहान मुले, अल्पसंख्याक, दलित, ज्यांना आवाज नाही त्यांचा पोलीसच आवाज बनतील. त्यांना न्याय मिळवून देणे हे पोलीस म्हणून आमचे कर्तव्य आहे. चोरी, घरफोडी, भांडण या कारणास्तव मानसिक तणावाखाली असलेल्या नागरिकांना मनस्ताप नको असतो. त्यामुळे ते पोलिसांत तक्रार करण्यास टाळाटाळ करतात किंवा वरिष्ठ अधिकाºयांकडे धाव घेतात. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी पोलीस ठाण्यात येणाºया नागरिकांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. गेल्या सहा महिन्यांत नागरिकांच्या तक्रारी न घेता त्यांना माघारी पाठविल्याच्या काही तक्रारी दाखल झाल्याने सहा पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावली आहे. यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही, अशा सूचना दिल्या. मोहिते यांच्या या निर्णयामुळे नागरिकांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
पोलिसांवरील विश्वास उडाला
मध्यंतरी सांगली पोलिसांनी अनिकेत कोथळे याचा खून करून मृतदेह आंबोली घाटात जाळला. या घटनेने राज्यभर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली. या घटनेनंतर अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्यात अधिकारी किंवा ठाणे अंमलदाराकडून व्यवस्थित बोलले जात नाही. तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जाते. काही वेळा आरोपींना पाठीशी घातले जाते. त्यामुळे आमचा पोलिसांवरील विश्वास उडाला आहे. आम्हाला न्याय मागण्यासाठी तुमच्यापर्यंत यावे लागते, ही खेदाची बाब आहे; अशा संतप्त भावना काही नागरिकांनी पोलीस अधीक्षक मोहिते यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत त्यांनी तक्रार दाखल करण्यास आलेल्या नागरिकाची तक्रार का घेतली नाही, याचे कारण आठ दिवसांत द्यावे, अशी नोटीस बजावली आहे.

Web Title: Citizens Abuse; Notice to six policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.