सर्किट बेंचप्रश्नी पुढील आठवड्यात सहा जिल्हयाची बैठक- २६ ला मुख्य न्यायाधीश यांची भेट : चिटणीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 07:46 PM2019-02-11T19:46:09+5:302019-02-11T20:12:49+5:30

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनी २६ फेब्रुवारीला भेट दिली आहे; त्यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्तील वकिलांची पुढील आठवड्यात कोल्हापुरात बैठक घेतली जाईल, असे कोल्हापूर

Circuit BenchPrint Next Six District Meetings - Meeting of Chief Justice on 26th: Chitnis | सर्किट बेंचप्रश्नी पुढील आठवड्यात सहा जिल्हयाची बैठक- २६ ला मुख्य न्यायाधीश यांची भेट : चिटणीस

सर्किट बेंचप्रश्नी पुढील आठवड्यात सहा जिल्हयाची बैठक- २६ ला मुख्य न्यायाधीश यांची भेट : चिटणीस

Next
ठळक मुद्दे‘बार’ची सर्वसाधारण सभा : वकिलांसाठी कल्याणकारी योजनेकरिता केंद्र, राज्य सरकारने आर्थिक संकल्पात तरतूद करावी;

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनी २६ फेब्रुवारीला भेट दिली आहे; त्यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्तील वकिलांची पुढील आठवड्यात कोल्हापुरात बैठक घेतली जाईल, असे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी सोमवारी सांगितले.

ते जिल्हा बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत न्यायसंकुलमधील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. भारतीय विधिज्ञ परिषदेने वकिलांसाठी कल्याणकारी योजनेकरिता केंद्र व राज्य सरकारने आर्थिक संकल्पामध्ये तरतूद करावी व त्या योजना राबविण्यात याव्यात, असा ठराव सभेत यावेळी करण्यात आला.

अ‍ॅड. चिटणीस म्हणाले, मुख्य न्यायाधीश पाटील यांना भेटण्यासाठी कितीजणांचे शिष्टमंडळ जायचे याचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन करू,फक्त तुम्ही माझ्या पाठीशी राहा. सर्किट बेंचबाबत सहा जिल्'ांपैकी तीन जिल्'ांतील वकिलांशी यापूर्वी माझे बोलणे झाले आहे; त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्हयातील वकिलांची पुढील आठवड्यात बैठक घेणार आहे. त्यात शिष्टमंडळाबाबत निर्णय होईल. शनिवारी (दि. १६) सोलापूर जिल्'ातील वकिलांना भेटू.

अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक म्हणाले, सर्किट बेंचप्रश्नी सहा जिल्हयातील  वकिलांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या. मुख्य न्यायाधीश पाटील यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने वकिलांची संख्या असावी. अ‍ॅड. किरण पाटील म्हणाले, अजून आपल्याकडे १५ दिवस आहेत. सर्व पदाधिकारी, वकिलांना घेऊन ठोस निर्णय घ्या. मुख्य न्यायाधीश यांच्याकडे सर्किट बेंचप्रश्नी भक्कम बाजू मांडा. अ‍ॅड. अजित मोहिते म्हणाले, मुख्य न्यायाधीश यांच्या भेटीपूर्वी सोलापूर जिल्हयातील वकिलांना भेटण्याचे नियोजन करावे; त्यासाठी एक लक्झरी बस काढून, सर्वजण त्यांच्याकडे जाऊया. अ‍ॅड. विजय महाजन म्हणाले, मुख्य न्यायाधीशांना भेटा; पण ते म्हणतील फाईल पाहतो. मोघमपणे उत्तर देतील; त्यामुळे सर्किट बेंचप्रश्नी ठोस बाजू मांडा.

अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, कोल्हापूरसह सहा जिल्हयातील आठ ते १0 शिष्टमंडळ मुख्य न्यायाधीशांना भेटावे. अ‍ॅड. अशोक पाटील म्हणाले, २५ ते ३० जणांचे शिष्टमंडळ भेटायला गेल्यावर ताकद दिसेल; त्यामुळे वकिलांची संख्या जास्त असू दे. यावेळी अ‍ॅड. पी. एस. भावके, अ‍ॅड. हुक्कीरे यांनी मते व्यक्तकेली.

सेक्रेटरी अ‍ॅड. सुशांत गुडाळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष अ‍ॅड. आनंदराव जाधव यांनी ठरावाचे वाचन केले. सभेत अ‍ॅड. तहजीज नदाफ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अ‍ॅड. ओेंकार देशपांडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

 

 

Web Title: Circuit BenchPrint Next Six District Meetings - Meeting of Chief Justice on 26th: Chitnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.