कोल्हापूर चित्रपटसृष्टीची शताब्दी साजरी, राणादाच्या उपस्थितीत कॅमेरा पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 03:38 PM2017-12-01T15:38:51+5:302017-12-01T15:48:01+5:30

कोल्हापूर चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभाचे पूजन संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. राणादाच्या (अभिनेते हार्दिक जोशी) उपस्थितीत कलामहर्षि बाबूराव पेंटर व आनंदराव पेंटर यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. यानंतर चित्रपट व्यावसायिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

The centennial celebration of Kolhapur cinema, in the presence of Rana, Camera Poojan | कोल्हापूर चित्रपटसृष्टीची शताब्दी साजरी, राणादाच्या उपस्थितीत कॅमेरा पूजन

कोल्हापूर चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त शुक्रवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभाचे पूजन संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. यावेळी यशवंत भालकर, चंद्रकुमार नलगे, अभिनेता हार्दिक जोशी, विजयमाला पेंटर, बाळा जाधव, अजय कुरणे यांच्यासह चित्रपट व्यावसायिक उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

googlenewsNext
ठळक मुद्देकलामहर्षि बाबूराव पेंटर व आनंदराव पेंटर यांच्या प्रतिमांचे पूजन चित्रपट व्यावसायिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीरसंयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभाचे पूजन

कोल्हापूर : कोल्हापूर चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभाचे पूजन संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. राणादाच्या (अभिनेते हार्दिक जोशी) उपस्थितीत कलामहर्षि बाबूराव पेंटर व आनंदराव पेंटर यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. 


दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या कार्यक्रमानुसार सकाळी दहा वाजता कलामहर्षि बाबूराव पेंटर व आनंदराव पेंटर यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. यावेळी विजयमाला पेंटर, अशोक पेंटर, अभिनेते हार्दिक जोशी, किशोर मिस्कीन, महामंडळाचे कार्यवाह बाळा जाधव, सतिश बिडकर, अजय कुरणे, ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे, हेमसुवर्णा मिरजकर, शोभा शिराळकर, उपस्थित होत्या.

दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी थोडक्यात कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा इतिहास सांगितला. लेखक चंद्रकुमार नलगे यांनी मनोगत व्यक्त केले.
यानंतर चित्रपट व्यावसायिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

 

 

Web Title: The centennial celebration of Kolhapur cinema, in the presence of Rana, Camera Poojan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.