निवडणूक काळात पावणेदोन कोटींची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:17 AM2019-04-22T11:17:16+5:302019-04-22T11:18:22+5:30

निवडणूक जाहीर झाल्यापासून ते प्रचार सांगतेपर्यंत जिल्ह्यात आजअखेर पावणेदोन कोटींची रोकड भरारीपथक आणि पोलिसांच्या तपासणीत सापडली आहे. या रकमेचा हिशेब देता न आल्याने ती बेहिशेबी समजून आयकर विभागाच्या इन्वेस्टिगेटीव्ह विभागाकडून ती जप्त करण्यात आली आहे. आता आयकर विभागाच्या कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार बैठकीत दिली.

Cash seized cash worth Rs | निवडणूक काळात पावणेदोन कोटींची रोकड जप्त

निवडणूक काळात पावणेदोन कोटींची रोकड जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणूक काळात पावणेदोन कोटींची रोकड जप्तजिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती, आयकर विभागाकडून कारवाई सुरू

कोल्हापूर : निवडणूक जाहीर झाल्यापासून ते प्रचार सांगतेपर्यंत जिल्ह्यात आजअखेर पावणेदोन कोटींची रोकड भरारीपथक आणि पोलिसांच्या तपासणीत सापडली आहे. या रकमेचा हिशेब देता न आल्याने ती बेहिशेबी समजून आयकर विभागाच्या इन्वेस्टिगेटीव्ह विभागाकडून ती जप्त करण्यात आली आहे. आता आयकर विभागाच्या कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार बैठकीत दिली.

१0 मार्चला आचारसंहिता सुरूझाल्यापासून नाक्यानाक्यांवरील स्थिर सर्वेक्षणासह फिरत्या पथकांकडून तपासणी करण्यात आली आहे. प्रचार सांगतेच्या कालावधीपर्यंत जिल्ह्यातील नऊ ठिकाणी रक्कम सापडली आहे. रक्कम सापडण्याचा पहिला प्रकार शाहूवाडीत घडला. तेथे १0 लाख ५ हजारांची रक्कम सापडली, त्याचा हिशेब देता न आल्याने ती आयकर विभागाकडे देण्यात आली. या पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी चंदगड नाक्यावर नऊ लाख ७६ हजार रुपये सापडले, त्याचाही हिशेब लागला नाही. गगनबावड्यात दोनवेळा रक्कम सापडली. पहिल्यावेळी १९ लाख ५0 हजार, तर दुसºया वेळी १0 लाखांची रक्कम होती.

शाहूपुरीत ६३ लाख, संभाजीपूरमध्ये ७४ लाख अशी सर्वांत मोठी रक्कम सापडली. तिच्या पडताळणीची प्रक्रिया अजूनही सुरूआहे. शिरोळमध्ये दोन लाख ७६ हजार, तर इचलकरंजीत दीड लाख आणि रेल्वेस्थानकावर तीन लाख अशी आतापर्यंत एक कोटी ८८ लाख ५७ हजारांची रक्कम सापडली आहे, यातील दोन-अडीच लाखांच्याच रकमेचा हिशेब लागला आहे. उर्वरित रकमेचा हिशेब लागला नसल्याने ती आयकर विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या पडताळणीनंतर या रकमेचा निवडणुकीशी संबंध असल्यास निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार पुढील कारवाई सुरूहोणार आहे.
 

 

Web Title: Cash seized cash worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.