शिवाजी पुलावरील केबल पेटली,मधाचे पोळे उठल्याने वाहनधारकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:52 AM2019-03-26T11:52:17+5:302019-03-26T11:53:07+5:30

कोल्हापूर : येथील शिवाजी पुलावरून गेलेल्या एका वृत्तवाहिनीची केबल शॉर्टसर्किटने पेटल्याने गोंधळ उडाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ...

The cable belt of Shivaji bridge, the holes of the honey bees, and the driver of the car | शिवाजी पुलावरील केबल पेटली,मधाचे पोळे उठल्याने वाहनधारकांची तारांबळ

कोल्हापुरातील शिवाजी पुलावरील खासगी वृत्तवाहिनीच्या केबलला लागलेली आग विझविताना अग्निशामक दलाचे जवान.

Next
ठळक मुद्देशिवाजी पुलावरील केबल पेटलीमधाचे पोळे उठल्याने वाहनधारकांची तारांबळ

कोल्हापूर : येथील शिवाजी पुलावरून गेलेल्या एका वृत्तवाहिनीची केबल शॉर्टसर्किटने पेटल्याने गोंधळ उडाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. दरम्यान, पाण्याच्या फवाऱ्याने पुलाखाली बसलेले मधाचे पोळे उठल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. या प्रकाराने काहीवेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

शिवाजी पुलावरून अनेक केबल गेल्या आहेत. एका खासगी वृत्तवाहिन्याच्या केबलला सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास आग लागली. धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील वाहनधारकांच्यात भीती पसरली.

नेमकी कशाला आग लागली हे पाहण्यासाठी नागरिक पुलावर थांबून पाहू लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली. केबलला आग लागल्याने नागरिकांनी अग्निशामक दलास वर्दी दिली. अधिकारी तानाजी कवाळे, जवान शिवाजी खेडकर, सर्जेराव लोहार, जयवंत डकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पाण्याचा फवारा मारून आग विझवली. दरम्यान, पुलाखाली बसलेले मधाचे पोळे उठून मधमाशा रस्त्यावर आल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

 

 

Web Title: The cable belt of Shivaji bridge, the holes of the honey bees, and the driver of the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.