BJP is with Prakash Ambedkar: Jogendra Kawade | Lok Sabha Election 2019 : भाजपला प्रकाश आंबेडकरांची साथ: जोगेंद्र कवाडे 
Lok Sabha Election 2019 : भाजपला प्रकाश आंबेडकरांची साथ: जोगेंद्र कवाडे 

ठळक मुद्देभाजपला प्रकाश आंबेडकरांची साथ: जोगेंद्र कवाडे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रतिपादन

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीला वंचित आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची साथ असल्याचे आरोप होऊ लागले आहेत; हे त्यांच्या भूमिकेवरूनच स्पष्ट होत आहे, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे केले.

कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. कवाडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ही कॉँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीसोबत राहणार आहे. भाजप सरकार हे देशासमोरील संकट आहे. त्याला रोखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे एकत्र आलेले विविध गट हे त्याचे फलित आहे.

यावेळी विद्याधर कांबळे, सोमनाथ घोडेराव, सुरेश सावर्डेकर, रमेश कांबळे, अब्बास शेख, जयसिंग कांबळे, विलास भास्कर, प्रकाश कांबळे, भगवान कांबळे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 

 


Web Title: BJP is with Prakash Ambedkar: Jogendra Kawade
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.