'BJP makes the country a' business' to entrepreneurs | 'भाजपाने देशाला ‘धंदा’ बनवून उद्योजकांना पोसले'
'भाजपाने देशाला ‘धंदा’ बनवून उद्योजकांना पोसले'

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : भाजप सरकारने देशाला ‘धंदा’ बनवून देशातील मोठे उद्योजक पोसण्याचे काम केले आहे. या परिस्थितीविरूद्ध लढण्यासाठी लढवय्या व योग्य उमेदवार निवडून आला पाहिते. देश वाचविण्यासाठी ते गरजेचे आहे. त्यामध्ये चूक झाली, तर देश हरतो. त्यामुळे आपली जबाबदारी समजून राजू शेट्टी यांना संसदेत पाठवा, असे आवाहन दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला भाजपने निवडणुकीचे भांडवल बनवले आहे. जवानांच्या नावावर मते मागत आहेत. या सर्वांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शेतकरी आपले पालन-पोषण करतो. त्यामुळे शेतकरी हा सर्वप्रथम महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देशभरात आवाज उठविणाºया राजू शेट्टींना बळ द्या, असे आवाहनही प्रकाश राज यांनी केले.


Web Title: 'BJP makes the country a' business' to entrepreneurs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.