सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी मोठा बंदोबस्त, कोल्हापूर, इचलकरंजी शहर : १०८४ पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:26 PM2018-09-21T12:26:39+5:302018-09-21T12:31:32+5:30

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कोल्हापूर व इचलकरंजी शहरांसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, आठ पोलीस उपअधीक्षक, २६ पोलीस निरीक्षकांसह जलद कृती दल, राज्य राखीव पोलीस यांचा समावेश आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार गुरुवारी विशेष शाखेने पत्रक काढले आहे.

Big settlement for public Ganesh immersion, Kolhapur, Ichalkaranji city: 1084 police | सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी मोठा बंदोबस्त, कोल्हापूर, इचलकरंजी शहर : १०८४ पोलीस

सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी मोठा बंदोबस्त, कोल्हापूर, इचलकरंजी शहर : १०८४ पोलीस

Next
ठळक मुद्देसार्वजनिक गणेश विसर्जनासाठी मोठा बंदोबस्तकोल्हापूर, इचलकरंजी शहर : १०८४ पोलीस

कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कोल्हापूर व इचलकरंजी शहरांसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यामध्ये दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, आठ पोलीस उपअधीक्षक, २६ पोलीस निरीक्षकांसह जलद कृती दल, राज्य राखीव पोलीस यांचा समावेश आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार गुरुवारी विशेष शाखेने पत्रक काढले आहे.

कोल्हापूर शहर व इचलकरंजी शहरात गणेशोत्सव आहे. रविवारी (दि. २३) सार्वजनिक गणेश विसर्जन आहे. यासाठी कोल्हापूर शहरासाठी एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक व इचलकरंजीसाठी एक अशा दोन वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही शहरांसाठी एकूण ९२ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, १०८४ पोलीस कर्मचारी, ६३१ गृहरक्षक असा बंदोबस्त देण्यात आला आहे.

असा राहणार बंदोबस्त

कोल्हापूर शहर :
पाच पोलीस उपअधीक्षक, २२ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक / उपनिरीक्षक ६८, पोलीस कर्मचारी ८३४, होमगार्ड (गृहरक्षक) ४३९, तीन जलद कृती दल, तीन राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, पाच स्ट्रायकिंग फोर्स, पोलीस मुख्यालयातील पाच स्ट्रायकिंग फोर्स व दोन प्लाटून.

इचलकरंजी शहर
तीन पोलीस उपअधीक्षक, चार पोलीस निरीक्षक, २४ सहायक निरीक्षक / उपनिरीक्षक, २३९ पोलीस कर्मचारी, २४५ होमगार्ड, एक प्लाटून, तीन स्ट्रायकिंग.
 

 

Web Title: Big settlement for public Ganesh immersion, Kolhapur, Ichalkaranji city: 1084 police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.