बेळगाव : रेल्वे रुळावर बिबट्या सापडला मृतावस्थेत, रेल्वेची धडक बसल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 04:09 PM2018-06-28T16:09:33+5:302018-06-28T16:11:49+5:30

रेल्वे आणि वन खात्याने लोंढा कॅसरलॉक मार्गावर बिबट्या फिरत असून दूध सागर धबधबा पाहायला  जाणाऱ्या पर्यटकांना अलर्ट दिला होता, मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्याना हा बिबट्या मृतावस्थेत मिळाला आहे. गुरुवारी सकाळी लोंढा ते कॅसरलॉक रेल्वे मार्गावर तैनात रेल्वे कर्मचाऱ्यांना मृत अवस्थेत सापडला आहे.

Belgaum: Leopards on the railway track collapsed, suspected of being hit by a train | बेळगाव : रेल्वे रुळावर बिबट्या सापडला मृतावस्थेत, रेल्वेची धडक बसल्याचा संशय

बेळगाव : रेल्वे रुळावर बिबट्या सापडला मृतावस्थेत, रेल्वेची धडक बसल्याचा संशय

Next
ठळक मुद्देरेल्वे रुळावर बिबट्या सापडला मृतावस्थेतरेल्वेची धडक बसल्याचा संशय

बेळगाव : रेल्वे आणि वन खात्याने लोंढा कॅसरलॉक मार्गावर बिबट्या फिरत असून दूध सागर धबधबा पाहायला  जाणाऱ्या पर्यटकांना अलर्ट दिला होता, मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्याना हा बिबट्या मृतावस्थेत मिळाला आहे. गुरुवारी सकाळी लोंढा ते कॅसरलॉक रेल्वे मार्गावर तैनात रेल्वे कर्मचाऱ्यांना मृत अवस्थेत सापडला आहे.


बेळगाव जिल्ह्यातील लोंढा येथून रेल्वे रुळावरून कॅसरलॉक च्या दिशेने दुधसागर धबधबा पाहण्यासाठी हजारो पर्यटक रेल्वे ट्रॅकचा वापर करून जंगलातून चालत ये जा करत असतात पावसाळ्यात धबधबा पाहायला जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. याच भागात रेल्वे रुळांच्या बाजूला बिबट्यांचे दर्शन झाल्याने पर्यटकांना गोवा आणि कर्नाटक वन खाते आणि रेल्वे खात्याच्या वतीने अलर्ट दिला होता. 

लोंढा ते कॅसरलॉक मध्ये ड्युटी करणाऱ्या ट्रॅकमनना बिबट्या मृतावस्थेत मिळाला आहे बिबट्याच्या डोकीला जबर मार बसला असल्याने रेल्वेची त्याला धडक बसली असावी, त्यामुळेच रुळांच्या बाजूला पडला असा संशय रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. मृत बिबट्याचा पंचनामा करून वन खात्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 

 

Web Title: Belgaum: Leopards on the railway track collapsed, suspected of being hit by a train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.