थर्माकोलवर बंदी कायम, कोल्हापूर जिल्ह्यातील शंभरहून कलाकारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 03:35 PM2018-07-14T15:35:11+5:302018-07-14T15:41:56+5:30

थर्माकोल वस्तू, मखर आणि सजावटीच्या साहित्यावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शंभरहून अधिक कलाकारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असून दिड कोटी रुपयांच्या उलाढालीवरही परिणाम होणार आहे. पुढचा पर्याय काय शोधावा या संभ्रम अवस्थेत ही मंडळी आहेत.

The ban on thermocol, the unemployed Kurhad from hundreds of artists from Kolhapur district | थर्माकोलवर बंदी कायम, कोल्हापूर जिल्ह्यातील शंभरहून कलाकारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड

थर्माकोलवर बंदी कायम, कोल्हापूर जिल्ह्यातील शंभरहून कलाकारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील शंभरहून कलाकारांवर बेरोजगाराची कुऱ्हाडउच्च न्यायालयाकडून थर्माकोलवर बंदी कायम ; दिड कोटींची उलाढालीवर परिणाम

कोल्हापूर : थर्माकोल वस्तू, मखर आणि सजावटीच्या साहित्यावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शंभरहून अधिक कलाकारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असून दिड कोटी रुपयांच्या उलाढालीवरही परिणाम होणार आहे. पुढचा पर्याय काय शोधावा या संभ्रम अवस्थेत ही मंडळी आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात थर्माकोलची मंदीरे, लग्नात नवरा, नवरीची, आडनावांची अक्षरे, जाऊळ, बारसे, वाढदिवस आदी कार्यक्रमात नावे, सजावट करण्यासाठी थर्माकोलचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र या निर्णयामुळे थर्माकोल कलाकृती साकारणाऱ्या कलाकारांना मेहनताना म्हणून अगदी दोनशे ते दहा हजार रुपयांपर्यंत मिळत होता.

गणेशोत्सव जरी वर्षातून एकदा येत असेल तर त्याचे काम वर्षभर सुरु असायचे. त्यात कलाकार थर्माकोलची शिट घेवून त्यावर कार्व्हींग, कलाकुसर करीत असे. त्यातून वर्षभर हा व्यवसाय सुरु असायचा. एकूणच दिड कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल या व्यवसायातून होती.

यासह शंभरहून अधिक कलाकार या व्यवसायात होते. त्यात अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या गणेशोत्सवातही थर्माकोलचा वापर करायचा नाही. त्यामुळे एकूणच पर्यावरणाचा विचार करुन हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, दुसरा पर्याय नसल्याने थर्माकोलची मंदीरे, सजावटीचे काम करणाऱ्यांमध्ये दुसरा रोजगार काय करायचा असा संभ्रम निर्माण झाला आहे.


जिल्ह्यात नियमित १०० ते २०० किलो थर्माकोल शीटच्या रुपात १० एम.एम. ते ५०० एम.एम. पर्यतच्या थर्माकोल मागणीप्रमाणे विक्रीसाठी येतो. त्यात गणेशोत्सवाच्या काळात सुमारे एक टन थर्माकोलची विक्री होते. त्यात कोल्हापूरसह कोकणातही मंदीरे, सजावटीसाठी हा थर्माकोल नेला जातो. किंमतही अगदी १० रुपयांपासून घेईल त्या साईजनूसार आहे.

पॅकेजिंग करीता वापरला जाणारा थर्माकोलचा मोठा प्रश्न आहे. यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंना त्याचे पॅकींग असते. थर्माकोल शॉकआॅब्झरचे काम करतो. आतील वस्तु सुरक्षित ठेवतो. अनेक ठिकाणी नवीन फ्रीज, टिव्ही, मोबाईल, अगदी मोटरसायकल घेतली तरी काही ठिकाणी थर्माकोल सुरक्षितेसाठी पॅकींग म्हणून वापरला जातो. हा थर्माकोल नागरीक घरात कचरा नको म्हणून बाहेर फेकून देतात आणि हाच प्रदूषणालाही कारणीभूत असतो. याचाही विचार व्हावा. असा सूर नागरीकांतून होत आहे.

र्याय उपलब्ध

थर्माकोल ‘एक्स्पेडेड पॉलिस्ट्रीन ’नावाच्या पदार्थापासून बनते.तर याला पर्याय म्हणून ‘बायोफोन ’ पासून बनविलेल्या शीटही उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, थर्माकोलच्या दहा पट त्याची किंमत आहे. हा पर्यायही पुढे येवू शकतो. असे मत अनेक विक्रेत्यानी व्यक्त केले.
 

सद्यस्थितीत नवीन माल मागविणे बंद केले आहे. जिल्ह्यात सुमारे १०० हून अधिक कलाकार व १५ विक्रेते आहेत. पर्यावरणाचा विचार करता अन्य पर्याय निश्चितच शोधावा लागणार आहे.
- किशन लालवाणी , विक्रेते


माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. थर्माकोल प्रदूषणास कारणीभूत आहे. मात्र, बंदी करताना शासनाने पर्याय द्यावा. त्यातील काम करणाऱ्यांच्या हातालाही दुसरे काम द्यावे.
- मकरंद भोसले, विक्रेते
 

 

Web Title: The ban on thermocol, the unemployed Kurhad from hundreds of artists from Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.