ठळक मुद्देफेसबुकच्या माध्यमातून केबीसीकडून निमंत्रण २२ व्या वयापासून ६२ व्या वयापर्र्यतचे बच्चनवेडे सहभागी रोज रात्री तसेच दर रविवारी बच्चन यांंच्याच गाण्यांची मैफिल रंगतेएक बच्चन वेडा - लाख बच्चन वेडा अशी घोषणा


कोल्हापूर : महानायक अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन असलेला कौन बनेगा करोडपती हा रिअ‍ॅलिटी शो गेली १७ वर्षे सुरु आहे. आज , बुधवारी होणाºया या कार्यक्रमाच्या विशेष भागामध्ये कोल्हापूरच्या बच्चनवेडे कोल्हापुरी या ग्रुपचे सदस्य प्रेक्षक म्हणून सहभागी झालेले दिसणार आहेत.

बच्चनवेडे कोल्हापुरी हा कोल्हापुरातील केवळ बच्चनवेड्या सदस्यांचा ग्रुप आहे. सुधर्म वाझे यांनी ४ जानेवारी २0१५ रोजी या ग्रुपची स्थापना केली. प्रामुख्याने व्हॉटस अपवरील या ग्रुपने बच्चन यांच्याविषयीच्या डिक्सनरीपासुन बच्चन म्युझीकल नाईट, बच्चन चाहत्यांचे स्नेहसंमेलन, बच्चन यांच्या सन्मानार्थ डावखुºया व्यक्तींचा सहभाग असलेला लेफ्ट हॅन्डर्स डे गॅदरीग, बच्चन चित्र्कला स्पर्धा असे अनेक आगळेवेगळे आणि सामाजिक कार्यक्रमही या ग्रुपने आतापर्यंत आयोजित केले आहेत.

या ग्रुपमध्ये २२ व्या वयापासून ६२ व्या वयापर्र्यतचे बच्चनवेडे सहभागी असून त्यात १२ महिलांसह 90 सदस्यांचा समावेश आहे. ग्रुपचे नाव जरी कोल्हापूरी असले तरी त्यात दुबई, मस्कत, मुंबई, पुणे, बेळगाव आदी शहरातील सदस्यही सहभागी आहेत. या ग्रुपवर रोज रात्री तसेच दर रविवारी बच्चन यांंच्याच गाण्यांची मैफिल रंगते, त्यात अपवाद वगळता खंड पडलेला नाही.

या बच्चन वेडे ग्रुपची जिदंगी मिलके बितायेंगे हे ग्रुपथीम गाणे आहे तसेच अमिताभ बच्चन यांच्या नावानं चागंभलं असा जयघोषही आहे. बच्चन वेडे अशी कट्टर ओळ्ख असल्याने ग्रुपची एक बच्चन वेडा - लाख बच्चन वेडा अशी ताकद दर्शवणारी स्वत:ची ग्रुपची घोषणा आहे. केवळ मनोरंजनासाठी जमणे असा ग्रुपचा मूळ हेतू होता, परंतु हळुहळु ग्रुपने सामाजिक भान राखत गरीब आणि गरजु मुलांसाठी मदत देण्याचा कार्यक्रम केला.


आजारी असलेल्या साहेब अली यास एक लाख अठरा हजाराची मदत ग्रुपने केली शिवाय कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील टीबीच्या रुग्णांसाठी प्रोटीन्सचे वाटप करण्यात आले. शिवाय, टीबी निमुर्लनासाठी बुलेट रॅली काढुन प्रबोधनाचाही प्रयत्न केला. अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम केल्यामुळे तसेच ९९ टक्के शिस्त, अनुशासन, समभाव आदी तत्त्वावर चालणाºया ग्रुपची लोकप्रियता सोशल मिडीयावर आणि जनमानसात वाढतच राहिली आहे.

फेसबुकच्या माध्यमातून केबीसीकडून निमंत्रण

एका फेसबुक ग्रुपमध्ये एका बच्चनवेड्याने या ग्रुपतर्फे चालणाºया कार्यक्रमांच्या माहितीचे प्रमोशन केले होते,
ते प्रमोशन आॅगस्ट महिन्यात कौन बनेगाच्या आयोजकांच्या वाचण्यात आले आणि त्यांनी बच्चन वेडे ग्रुपशी संपर्क साधून ग्रुपच्या सदस्यांना आमंत्रित केले.

पहिल्या टप्प्यात ३३ आणि दुसºया टप्प्यात ४४ बच्चनवेडे सदस्यांनी ग्रुपच्या माध्यमातुन मुबंई गोरेगाव येथील कौन बनेगा करोडपतीच्या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून सहभागी होण्याचा आणि तो भव्य कार्यक्रम आणि ग्रुपचे दैवत असलेल्या अमिताभ बच्चन यांना याची देही याची डोळा पाहण्याचा बहुमान मिळाला.

तीन तास अखंड बच्चन दर्शन झाल्यानंतर शेवटी त्यांच्यासोबत फोटो सेशन झाले. यावेळी ग्रुपमार्फत बच्चन ग्रुपने केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा अल्बम, अंबाबाईची मूर्ती आणि बच्चन यांच्यावरील डिक्सनरी अमिताभ बच्चन यांना भेट देण्यात आली. ही भेट पाहुन भारावलेल्या बच्चन यांनी स्नेह व आदरसहित असा शुभसंदेश स्व:हस्ते लिहित इंग्रजी आणि देवनागरी भाषेत दोन दोन आॅटोग्राफ दिले. भारावलेल्या बच्चन वेड्यानी त्यांच्यासमोरच अमिताभ बच्चन यांच्या नावानं चागंभला आणि एक बच्चनवेडा - लाख बच्चनवेडा असा जयघोषही केला. आॅगस्ट महिन्याच्या १८ तारखेला चित्रित झालेला हा भाग आज रात्री ९ वाजता प्रदर्शित होत आहे.


सहभागी झालेले सदस्य


सुधर्म वाझे, राजू नांद्रे, सचिन मणियार, किरण पाटील, वासिम जमादार, श्रध्दा वाझे, इंद्रजितसिंग घोरपडे गजेंंद्रगडकर, मैथिली घोरपडे, दीपक अष्टेकर, मृणाल अष्टेकर, राजू बोरगावे, प्रशांत शालगर, प्रकाश इंगवले, शिल्पा जोशी-पुसाळकर, प्रेषिता पुसाळकर, प्रसाद जमदग्नी, हर्षला वेदक, सूरज नाईक, श्रीकांत घोडके, आनंद पराडकर, परिणिता केरेकर
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.