बाबासाहेबांचे कार्य तरुणांना प्रेरक दिवाकर रावते : बाबासाहेब पाटील-सरूडकर यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, February 09, 2018 11:58pm

सरूड : संयमी बाबासाहेबांनी दुर्गम भागात केलेले कार्य तरुण नेतृत्वाला प्रेरक आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणारे आमदार सत्याजित पाटील यांना समाजाच्या प्रश्नाची चांगली जाण आहे.

सरूड : संयमी बाबासाहेबांनी दुर्गम भागात केलेले कार्य तरुण नेतृत्वाला प्रेरक आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणारे आमदार सत्याजित पाटील यांना समाजाच्या प्रश्नाची चांगली जाण आहे. त्याचे प्रत्यंतर आम्ही विधानसभेत पाहतो. आक्रमकपणे एखाद्या प्रश्नाची उकल व त्याचा पाठपुरावा हा बाणा नेतृत्वाला उभारी देणारा आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.

सरूड (ता. शाहूवाडी) येथे माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर दादा यांच्या अमृमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार निवेदिता माने होत्या.

यावेळी गौरव समितीच्यावतीने माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर व त्यांच्या सुविद्य पत्नी अनुराधा पाटील यांचा सत्कार परिवहन खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते केला. यावेळी विश्वास उद्योग समूहाचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी उद्योग समूहाच्यावतीने मानपत्र, शाल, श्रीफळ, चांदीची मूर्ती देऊन त्यांना गौरविले. तसेच सरूडकरांच्या कार्यावरील ‘अमृत गंध’ या पुस्तकाचे प्रकाशन विश्वास उद्योग समूहाचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते केले.

माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, शाहूवाडीसारख्या डोंगराळ भागात दादांचे कार्य व संपर्क मोठा आहे. चौफेर विकासात त्यांचे काम दीपस्तंभासारखे आहे.मानसिंगराव नाईक म्हणाले, सहकारातील दादांचे नेतृत्व आम्हाला प्रेरणादायी आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना संधी मिळालेल्या बाबासाहेब पाटील यांनी कर्तृत्वसिद्ध अभ्यासू प्रतिमेची छाप सोडली.

उदय साखरचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड म्हणाले, जेव्हा जेव्हा सत्यजित पाटील आमदारकीला उभे राहतील तेव्हा तेव्हा मी सरूडकरांच्या पाठीशी राहून तालुक्यातील आमदारकी कायम राहील. आमदार सत्यजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी खासदार कल्लाप्पण्णा आवाडे, आमदार संध्यादेवी कुपेकर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, माजी आमदार राऊ धोंडी पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील (कळेकर), बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, अपना बाजारच्या अध्यक्षा सुनीतादेवी नाईक, जि. प. सदस्य विजय बोरगे, आकांक्षा पाटील, हंबीरराव पाटील, सभापती डॉ. स्नेहा जाधव, उपसभापती दिलीप पाटील, सुजाता इंगळे, सूर्याजी इंगळे, प्राजक्ता पाटील, प्रीतम पाटील, सरपंच राजकुंवर पाटील, दत्तप्रसाद पाटील, भाई भारत पाटील, युवा नेते रणवीर गायकवाड, डी. जी. पाटील (कोतोली), आदी मान्यवर उपस्थित होते. माझ्यावर सामान्य कार्यकर्त्यांचे ऋण सत्काराला उत्तर देताना माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर म्हणाले, डोंगराळ भागातील सामान्य कार्यकर्त्यांनी मला डोक्यावर घेतले. ते ऋण माझ्यावर आहे. उदयसिंगराव गायकवाड यांनी मला राजकारणात आणले. बाळासाहेब माने यांनी मला काम करण्याची संधी दिली. सामान्यांच्या विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी सत्यजित यांच्या मागे ठाम राहाल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्नी अनुराधा हिचे मोठे पाठबळ राहिल्याने सरूडकरांचा भक्कम पाठिंबा प्राप्त करू शकलो, असे त्यांनी स्पष्ट केले. सरूड (ता. शाहूवाडी) येथे अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी डावीकडून शेकापचे जिल्हा सरचिटणीस भारत पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, दगडू पाटील, माजी उपसभापती नामदेव पाटील-सावेकर, आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, पं.स. सभापती डॉ. स्नेहा जाधव, जि. प. सदस्या आकांक्षा पाटील, उपसभापती दिलीप पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित

राज्यपालांनी घेतले अंबाबाईचे दर्शन, देवस्थान समितीच्यावतीने विशेष सन्मान
शिवाजी विद्यापीठात उत्साहात निघाली ग्रंथदिंडी, वाचनसंस्कृतीचा जागर
गांधीनगर सरपंचांना अब्रुनुकसानीची नोटीस
राज्यपाल कोल्हापूर दौऱ्यावर, नियोजित वेळेपेक्षा बारा मिनिटे आधीच रंकाळा भेट
गूळ सौदे बंदच; शेतकऱ्यांचे नुकसान : बाजार समितीत तिसºया दिवशीही वाद

कोल्हापूर कडून आणखी

राज्यपालांनी घेतले अंबाबाईचे दर्शन, देवस्थान समितीच्यावतीने विशेष सन्मान
शिवाजी विद्यापीठात उत्साहात निघाली ग्रंथदिंडी, वाचनसंस्कृतीचा जागर
गांधीनगर सरपंचांना अब्रुनुकसानीची नोटीस
राज्यपाल कोल्हापूर दौऱ्यावर, नियोजित वेळेपेक्षा बारा मिनिटे आधीच रंकाळा भेट
गूळ सौदे बंदच; शेतकऱ्यांचे नुकसान : बाजार समितीत तिसºया दिवशीही वाद

आणखी वाचा