मोफतच्या घरांसाठी दीड लाखावर अर्ज, आर्थिक सर्वेक्षणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केवळ १८,००० बेघर; गावोगावी होणार छाननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 06:20 PM2017-11-21T18:20:08+5:302017-11-21T18:22:55+5:30

कोल्हापूर : एकीकडे शासनाच्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १८ हजार बेघर नागरिक असताना आपण बेघर आहोत,

Application for one-and-a-half lakhs for free houses, only 18,000 homeless in Kolhapur district according to financial survey; Scrutiny will be done in the village | मोफतच्या घरांसाठी दीड लाखावर अर्ज, आर्थिक सर्वेक्षणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केवळ १८,००० बेघर; गावोगावी होणार छाननी

मोफतच्या घरांसाठी दीड लाखावर अर्ज, आर्थिक सर्वेक्षणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केवळ १८,००० बेघर; गावोगावी होणार छाननी

Next
ठळक मुद्देप्रशासनही अवाक् : , ७५ टक्के अर्ज अपात्र ठरणार१0 हजारांपेक्षा अधिक बेघर हे खुल्या गटातील पळवाटा काढून घर घेणाºयांना या छाननीमध्ये अपात्रतेचा झटका बसणार

समीर देशपांडे ।
कोल्हापूर : एकीकडे शासनाच्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १८ हजार बेघर नागरिक असताना आपण बेघर आहोत, कच्च्या घरात आहोत त्यामुळे प्रधानमंत्री योजनेतून घरकुल मिळावे, अशी मागणी करणारे १ लाख ५६ हजार १८२ अर्ज १२ तालुक्यांतून जिल्हा परिषदेकडे आल्याने ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रशासन अवाक् झाले आहे. आता खरोखरच कुणाला घर नाही हे पाहण्यासाठी ग्रामसेवकांपासून ते वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत सर्वजण फेरतपासणी करणार आहेत. यामध्ये किमान ७५ टक्के म्हणजेच सव्वा लाखापर्यंतचे अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून या योजनेचे संनियंत्रण करण्यात येते.

२0११ साली झालेल्या आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षणातून कोल्हापूर जिल्ह्यात ३२,९२६ जण बेघर असल्याची माहिती पुढे आली. हीच माहिती राष्ट्रीय माहिती केंद्रामार्फत ग्रामीण विकास यंत्रणेला उपलब्ध करून देण्यात आली. या यादीची जिल्हा परिषदेच्या यंत्रणेतून पुन्हा छाननी केल्यानंतर १४,000 अर्ज अपात्र ठरले आणि १८ हजारजण बेघर असल्याचे स्पष्ट झाले. यातील ८ हजार ३०० लाभार्थ्यांना गेल्या पाच वर्षांत घरे मंजूर करण्यात आली आहेत. यातील १0 हजारांपेक्षा अधिक बेघर हे खुल्या गटातील आहेत.

सर्वेक्षणानंतर पाच वर्षे झाल्याने या यादीत ज्यांचे नाव नाही आणि जे खरोखर बेघर आहेत, किंवा कच्च्या घरात राहतात अशांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेने केले होते. यामध्ये चक्क एक लाख ५६ हजार १८२ अर्ज जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज आल्याने आता पुन्हा या अर्जांची छाननी करणे क्रमप्राप्त बनले आहे. त्यामुळे गावागावांत सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आता ग्रामसेवकांवर देण्यात आली आहे.

ग्रामसेवकांनी पात्र, अपात्रची यादी निश्चित करावयाची असून, यानंतर गटविकास अधिकारी, शाखा अभियंता यांनी यातील ५ टक्के लाभार्थ्यांची तपासणी करावयाची असून, यानंतर जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी त्यातील २ टक्के लाभार्थ्यांची तपासणी करायची आहे ज्यांच्याकडे घरच नाही, जो बेघर आहे, किंवा ज्याचे अगदी मातीचे घर आहे, अशांसाठी ही योजना असल्याने पळवाटा काढून घर घेणाºयांना या छाननीमध्ये अपात्रतेचा झटका बसणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकीमुळे या कामात शैथिल्य आले होते. मात्र डिसेंबर २0१७ पर्यंत हे काम पूर्ण करावयाचे असल्याने आता तातडीने हे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गटविकास अधिकाºयांना दिले आहेत.

वडिलांच्या मालमत्तेत वाटा नसल्याचे करावे लागणार जाहीर
अनेकांनी एकत्र कुटुंब असताना घर नसल्याचे अर्ज दिले आहेत. मात्र, वारसा हक्काने त्यांना घर, शेती मिळणार असल्याने अशांना आपण बेघर असल्याचे सिद्ध करावे लागणार असून, वडिलांच्या मालमत्तेत आपला वाटा राहणार नसल्याचे जाहीर करावे लागणार आहे. ज्यांच्याकडे घरच नाही, जो बेघर आहे, किंवा ज्याचे अगदी मातीचे घर आहे, अशांसाठी ही योजना असल्याने पळवाटा काढून घर घेणाºयांना या छाननीमध्ये अपात्रतेचा झटका बसणार आहे.

मिळालं तर मिळालं
ज्यांचे घरकुल नाही, कच्चे घरकुल आहे त्यांनी अर्ज करा, असे आवाहन केल्यानंतर एकाच घरातील दोन, तीन भावांनी स्वतंत्रपणे अर्ज केल्याची उदाहरणे समोर आली आहेत.
‘मिळालं तर मिळालंं’ या भावनेतून हे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळेच बारा तालुक्यातील दीड लाखांपेक्षा अधिक अर्ज जमा होण्याचे हेच कारण आहे.


तालुका ग्रामसभेतून ग्रामसभेव्यतिरिक्त एकूण अर्ज
आलेले अर्ज आलेले अर्ज
आजरा ७३३२ २२0 ७५५२
भुदरगड १३५४७ १ १३५४८
चंदगड ९२५४ 0 ९२५४
गडहिंग्लज १00८७ ९७0 ११0५७
गगनबावडा २0६७ ३ २0७0
करवीर २२८२२ १५७ २२९७९
शिरोळ १२२१४ ५६६ १२७८0
कागल १0४९0 0 १0४९0
पन्हाळा ६२६८ ४७४२ ११0१0
राधानगरी १५0२३ 0 १५0२३
शाहूवाडी ८0२८ १९५१ ९९७९
हातकणंगले २४२५0 ६१८५ ३0४३५
एकूण १४१३८५ १४७९९ १५६१८२

Web Title: Application for one-and-a-half lakhs for free houses, only 18,000 homeless in Kolhapur district according to financial survey; Scrutiny will be done in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.