कोल्हापूरातील विविध ३३ महाविद्यालयांतील प्रवेशाची निवड यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 05:03 PM2019-07-10T17:03:18+5:302019-07-10T17:07:34+5:30

यावर्षी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी कोल्हापूर शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील प्रवेशाची निवड यादी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने बुधवारी जाहीर केली. यादी पाहण्यासाठी दुपारीनंतर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली. यावर्षी प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय समितीकडून आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. दोन फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया होणार आहे.

Announcing the list of admissions for 33 different colleges in Kolhapur | कोल्हापूरातील विविध ३३ महाविद्यालयांतील प्रवेशाची निवड यादी जाहीर

कोल्हापूरातील विविध ३३ महाविद्यालयांतील प्रवेशाची निवड यादी जाहीर

Next
ठळक मुद्देकोल्हापूरातील विविध ३३ महाविद्यालयांतील प्रवेशाची निवड यादी जाहीर पहिल्या फेरीत ८५५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश

कोल्हापूर :  यावर्षी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी कोल्हापूर शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील प्रवेशाची निवड यादी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने बुधवारी जाहीर केली. यादी पाहण्यासाठी दुपारीनंतर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली.
यावर्षी प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय समितीकडून आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. दोन फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया होणार आहे.

शहरातील अकरावी प्रवेशाची क्षमता १४६५६ इतकी असून, त्यासाठी ११६७९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. समितीकडून या अर्जांची छाननी करून निवड यादी तयार करण्यात आली. निवड यादीनुसार पहिल्या फेरीत एकूण ८५५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. या निवड यादीसह प्रवेशाच्या पुढील प्रक्रियेची माहिती केंद्रीय समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्राप्त अर्ज, मंजूर तुकड्या व प्रवेशाची क्षमता याचा विचार करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता, पसंतीक्रम, आरक्षणानुसार निवड यादी तयार केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेला नाही. त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये निश्चितपणे प्रवेश मिळणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी गुरुवार ते मंगळवार (दि. १६) दरम्यान, मूळ कागदपत्रांसह त्यांना मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश निश्चित करावयाचा आहे. बुधवारपासून अकरावीचे वर्ग सुरू होतील.

या पत्रकार परिषदेस केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे कार्याध्यक्ष प्रा. अशोक देशमुख, सदस्य प्रा. टी. के. सरगर, रवी पोर्लेकर, एस. एस. चव्हाण, आर. व्ही. कोळेकर, एन. एच. पिसाळ, जी. व्ही. खाडे, आदी उपस्थित होते.

 

Web Title: Announcing the list of admissions for 33 different colleges in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.