वेंकय्या नायडू यांच्या पत्नी कोल्हापूरात, घेतले अंबाबाईचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:05 PM2018-06-25T12:05:32+5:302018-06-25T12:14:22+5:30

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा मुप्पावरप्पू व मुलगी दीपा इम्माणी यांनी रविवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष महेश जाधव यांनी देवीची प्रतिमा व साडी देऊन त्यांचा सत्कार केला.

Ambaji's visit to Kolhapur, wife of Venkaiah Naidu | वेंकय्या नायडू यांच्या पत्नी कोल्हापूरात, घेतले अंबाबाईचे दर्शन

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा मुप्पावरप्पू व मुलगी दीपा इम्माणी यांनी कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष महेश जाधव यांनी देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, विजय पोवार उपस्थित होते. (छाया : दीपक जाधव)

Next
ठळक मुद्देवेंकय्या नायडू यांच्या पत्नी कोल्हापूरातघेतले अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर :  उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा मुप्पावरप्पू व मुलगी दीपा इम्माणी यांनी रविवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष महेश जाधव यांनी देवीची प्रतिमा व साडी देऊन त्यांचा सत्कार केला.


उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा मुप्पावरप्पू व मुलगी दीपा इम्माणी यांनी कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष महेश जाधव यांनी देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवाजीराव जाधव, विजय पोवार उपस्थित होते. (छाया : दीपक जाधव)

उपराष्ट्रपतींच्या पत्नी येणार असल्याच्या दौरा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वीच जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त झाल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांच्या प्रोटोकॉल व सुरक्षिततेच्या दृष्टीने तयारी सुरू होती.

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा मुप्पावरप्पू व मुलगी दीपा इम्माणी यांनी रविवारी कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी महेश जाधव, संगीता खाडे, ऐश्वर्या मुनीश्वर, शिवाजीराव जाधव उपस्थित होते.  (छाया : दीपक जाधव)

रविवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान त्यांचा ताफा भवानी मंडपात आला. शनिमंदिरमार्गे त्या मंदिरात गेल्या. देवीचे दर्शन घेतले. त्यांनी आणलेली साडी देवीला नेसविण्यात आली. त्यानंतर देवस्थान समितीच्या वतीने व श्रीपूजक मंडळाच्या वतीनेही त्यांचा देवीची मूर्ती, साडी, पेढे, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर त्या मातृलिंग दर्शनासाठी गेल्या.

यावेळी मंदिराच्या बाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.  (छाया : दीपक जाधव)

तिथे संकल्प सोडल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा मारून विद्यापीठ गेटमार्गे त्या परत गेल्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगी दीपा इम्माणी, प्रमिला आनंदन, चंद्राकुमारी जी, प्रमिला राजू, कविता सिद्दा रेड्डी, श्रीमती नीरजा उपस्थित होत्या.


यावेळी मंदिराच्या बाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.  (छाया : दीपक जाधव)
यावेळी देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव, प्रशांत गवळी, श्रीपूजक माधव मुनीश्वर, ऐश्वर्या मुनीश्वर उपस्थित होत्या.




 

 

Web Title: Ambaji's visit to Kolhapur, wife of Venkaiah Naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.