शिरोळ नगरपालिकेत सत्तांतर, फेरमतमोजणीतही निकाल कायम, अमरसिंह पाटील नगराध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:57 PM2018-10-22T12:57:55+5:302018-10-22T15:24:04+5:30

शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर शिरोळमध्ये सत्तांतर झाल्याचे स्पष्ट झाले. या पालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीचे वर्चस्व निर्माण झाले. या पालिकेत भाजप ७, शाहू आघाडी ९ आणि अपक्ष १ असे बलाबल झाल्याने राजर्षी शाहू आघाडीचे अमरसिंह पाटील ३३ मतांनी शिरोळचे नवे नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले.

After the municipality in Shirol, Amarsingh Patil Nutan was elected as the President of Shahu Front | शिरोळ नगरपालिकेत सत्तांतर, फेरमतमोजणीतही निकाल कायम, अमरसिंह पाटील नगराध्यक्ष

शिरोळ नगरपालिकेत सत्तांतर, फेरमतमोजणीतही निकाल कायम, अमरसिंह पाटील नगराध्यक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देशिरोळ नगरपालिकेत सत्तांतर, शाहू आघाडीचे अमरसिंह पाटील नूतन नगराध्यक्षकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ९ जागा, भाजपने जिंकल्या ७ जागा

शिरोळ : शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर शिरोळमध्ये सत्तांतर झाल्याचे स्पष्ट झाले. या पालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीचे वर्चस्व निर्माण झाले. या पालिकेत भाजप ७, शाहू आघाडी ९ आणि अपक्ष १ असे बलाबल झाल्याने राजर्षी शाहू आघाडीचे अमरसिंह पाटील ३३ मतांनी शिरोळचे नवे नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले.

शिरोळ नगरपालिका पंचवार्षिक निवडणूकीत भाजपाचा पराभव झाला. कॉंग्रेस, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस व स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्‍या राजर्षी शाहू विकास आघाडीने सत्‍ता काबीज केली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमरसिंह माने-पाटील ३३ मतांनी विजयी झाले.

नगराध्यक्ष पदासह पाच नगरसेवक पदासाठी फेर मतमोजणी घेण्यात आली होती. मात्र सुरुवातीला झालेल्‍या मतमोजणीप्रमाणे निकाल कायम राहिला. शिरोळ पालिकेसाठी रविवारी चुरशीने ८0 टक्‍के मतदान झाले होते. सोमवारी निकाल जाहीर झाला. यामध्‍ये राजर्षी शाहू आघाडीला ९, भाजपाला ७ तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला. अपक्ष अरविंद माने हे भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत. जिल्‍ह्यात शिरोळची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. 


शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी चुरशीने ८0  टक्के मतदान झाले़ २१७३१ मतदारांपैकी १७३६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला़ एकूण नगरसेवक पदाच्या १७ जागेसाठी ८३ उमेदवारांचे, तर नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले होते.

आज, सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर शिरोळची सत्ता कुणाकडे हे स्पष्ट झाले आहे़ पालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने नगरसेवक पदापेक्षा नगराध्यक्ष पदाच्या निकालाकडे उत्सुकता लागून राहिली होती.

गोकुळचे संचालक अनिल यादव यांच्या नेतृत्वाखालील भाजप, खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व काँग्रेस पक्ष यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडी, आमदार उल्हास पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडी आणि प्रमोद लडगे यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीत चौरंगी लढत झाली.

अमर पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जंयत पाटील यांचे नातेवाईक व राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्या पत्नी सुध्दा जिल्हा परिषद सदस्य होत्या.

शिरोळ नगरपालिका अंतिम निकाल

  1. नगराध्यक्ष : अमरसिंह पाटील
  2. शाहू आघाडी : ९
  3. भाजप : ७
  4. अपक्ष : १


शिरोळ नगरपालिका : विजयी उमेदवार

प्रभाग  -१ : योगेश पुजारी ( शाहू आघाडी), विदुंला यादव ( भाजपा)
प्रभाग -२ : अरविंद माने ( अपक्ष ), अनिता संकपाळ (भाजपा)
प्रभाग -३ : कुमुदिनी कांबळे ( शाहू आघाडी), राजेंद्र माने ( शाहू आघाडी)
प्रभाग -४ : सुनिता आरगे ( भाजपा), तातोबा पाटील (शाहू आघाडी)
प्रभाग -५ : इमान अत्तार (भाजपा), कमलाकर शिंदे ( शाहू आघाडी)
प्रभाग- ६ : दादासो कोळी (भाजपा), कविता भोसले (भाजपा)
प्रभाग -७ : करूणा कांबळे (शाहू आघाडी), श्रीवर्धन माने देशमुख (भाजपा)
प्रभाग -८ : सुरेखा पुजारी, जयश्री धर्माधिकारी, प्रकाश गावडे (शाहू आघाडी)


पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, पाशा पटेल, शिवसेनेचे लक्ष्मण वडले या दिग्गजांच्या प्रचारातील सहभागामुळे निवडणुकीत रंगत आली होती.

सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला, तेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, प्रशासक तथा तहसीलदार गजानन गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड हे मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात उपस्थित होते. आठ टेबलांवर मतमोजणी पार पडली.एकाचवेळी आठ प्रभागांतील मतमोजणी झाली.
 

Web Title: After the municipality in Shirol, Amarsingh Patil Nutan was elected as the President of Shahu Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.