शिबिरात ९८१ खेळाडूंना फुटबॉलचे धडे -: शिवाजी स्पोर्टस्तर्फे मोफत प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:49 AM2019-05-22T00:49:01+5:302019-05-22T00:49:25+5:30

नवीन खेळाडू निर्माण होण्यासाठी शिवाजी स्पोर्टस् अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला

9 81 players' football lessons: - Free training by Shivaji Sports | शिबिरात ९८१ खेळाडूंना फुटबॉलचे धडे -: शिवाजी स्पोर्टस्तर्फे मोफत प्रशिक्षण

शिबिरात ९८१ खेळाडूंना फुटबॉलचे धडे -: शिवाजी स्पोर्टस्तर्फे मोफत प्रशिक्षण

Next
ठळक मुद्दे५४ मार्गदर्शकांनी सांगितले खेळातील बारकावे

कोल्हापूर : नवीन खेळाडू निर्माण होण्यासाठी शिवाजी स्पोर्टस् अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. यामध्ये तब्बल ९८१ शिबिरार्थिंनी सहभाग घेतला.

शहरातील ११ प्रशस्त मैदानांवर पार पडलेल्या या शिबिरात १० ते १८ वयोगटातील सुमारे ९८१ मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. या शिबिरात राष्ट्रीय खेळाडू, एन.आय.एस. व आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकांनी मोफत मार्गदर्शन केले. शिबिरास ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, उद्योजक चंद्रकांत जाधव, चाटे शिक्षण समूहाचे संचालक डॉ. भारत खराटे, प्रकाश राठोड, के. एस. ए. मानद सरचिटणीस माणिक मंडलिक, माजी नगरसेवक विनायक फाळके, नगरसेवक संभाजी जाधव, सचिन पाटील, दीप संघवी, जयेश कदम, आदींचे सहकार्य लाभले. एकूण ५४ मार्गदर्शकांनी अकॅडमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉलचे तंत्रशुद्ध धडे दिले.

यंदा शिबिराचे २० वे वर्ष होते. त्यात उदय पाटील, किरण साळोखे, प्रमोद भोसले, सुधाकर पाटील, मिथुन मगदूम, सुशील गायकवाड, रोहन कदम, प्रमोद बोंडगे, प्रदीप साळोखे, संतोष पोवार, अभिजित गायकवाड, शरद मेढे, सागर श्ािंदे, पप्पू नलवडे, संदीप भोसले, नंदकुमार जांभळे, चंदू जांभळे, आशिष पाटील, चेतन रोहिडे, सुरेश चव्हाण, अशोक पोवार, अनिरुद्ध शिंदे, दीपक शिंदे, सत्यजित पाटील, मयूर मोरे, प्रवीण उगारे, विनायक चौगले, अजित पाटील, रणवीर चव्हाण, गजानन मनगुतकर, विजय शिंदे, अमित शिंत्रे, शैलेश देवणे, प्रियंका गवळी, ऐश्वर्या हवालदार, आदींचा समावेश होता.


कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे शिवाजी स्पोर्टस् अकॅडमीतर्फे आयोजित केलेल्या मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिराची सांगता मंगळवारी सकाळी झाली. यावेळी खेळाडूंना उद्योजक दीप संघवी, नगरसेवक संभाजी जाधव, सचिन पाटील, आदी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: 9 81 players' football lessons: - Free training by Shivaji Sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.