पाणी पुरवठा न करता ४४ हजारांचे बिल, महापालिकेचा बिल भरण्याचा तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 05:40 PM2019-01-16T17:40:21+5:302019-01-16T17:43:16+5:30

प्रत्यक्षात २0१३ पासून पाणी पुरवठा होत नसताना चक्क ४४ हजार रुपयांचे बिल भरण्याचा तगादा महापालिकेने भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राकडे लावला आहे. नळ कनेक्शन बंद करण्याचा अर्जही थकबाकी भरल्याशिवाय बंद करता येत नसल्याचे कारण सांगून सुरू ठेवल्याने सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेची कोंडी झाली आहे.

44 thousand bill without water supply | पाणी पुरवठा न करता ४४ हजारांचे बिल, महापालिकेचा बिल भरण्याचा तगादा

पाणी पुरवठा न करता ४४ हजारांचे बिल, महापालिकेचा बिल भरण्याचा तगादा

Next
ठळक मुद्देपाणी पुरवठा न करता ४४ हजारांचे बिलमहापालिकेचा भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राला झटका

कोल्हापूर : प्रत्यक्षात २0१३ पासून पाणी पुरवठा होत नसताना चक्क ४४ हजार रुपयांचे बिल भरण्याचा तगादा महापालिकेने भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राकडे लावला आहे. नळ कनेक्शन बंद करण्याचा अर्जही थकबाकी भरल्याशिवाय बंद करता येत नसल्याचे कारण सांगून सुरू ठेवल्याने सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेची कोंडी झाली आहे.

भालजी पेंढारकर यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या वतीने विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. या ठिकाणी कला प्रबोधिनी संचलित इंटिरिअर डिझायनिंग महाविद्यालयही कार्यरत आहेत.

संस्थेच्या वतीने चित्रकला, गायन, वादन, नृत्य आणि चित्रपट नाट्य अभिनयाचे वर्ग घेतले जातात; त्यामुळे रोज २00 ते २५0 विद्यार्थी आणि शिक्षकांची येथे वर्दळ असते. अशा केंद्रामध्ये स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे; मात्र २0१३/१४ पासून या केंद्राला पाणी पुरवठा बंद आहे.

याबाबत वेळोवेळी ई वॉर्ड पाणी पुरवठा केंद्रात आणि जलअभियंता यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितल्यानंतरही अखेर संस्थेने महापालिकेच्या जनता दरबारात तक्रार केली. तेव्हा परवानाधारक प्लंबरकडून २00 फूट लांबीवरून कनेक्शन घेण्यास सांगण्यात आले.

त्यासाठी संस्थेने १७ हजार रुपये खर्च केले; परंतु कनेक्शन बदलूनही अजूनही येथे पाणी येत नाही; त्यामुळे नाइलाजाने संस्थेला ५0 हजारांहून अधिक रक्कम खर्च करून रोज बाहेरून पाणी आणावे लागते. संस्थेच्या विद्यार्थ्यांची स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी यासाठी हा खर्च करावा लागला आहे.

मात्र एकीकडे पाणी येत नसताना दुसरीकडे पाण्याची बिले मात्र नियमित येत आहेत. यासाठी कनेक्शन बंद करण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली; मात्र ४४ हजार रुपये थकबाकी भरल्याशिवाय कनेक्शन बंद करता येत नसल्याचे महापालिकेने कळविले आहे.

पाणी सुरू करा, दुरूस्त बील भरू

एकीकडे पाणी येत नसताना थकबाकी विलंब आकार, सांडपाणी व्यवस्थापन अधिभार आकारणे चुकीचे आहे. हे बिल दुरूस्त करून पाणी सुरू केल्यास संस्था बिल भरेल. मात्र पाणी न देताच चुकीचे बिल कसे भरायचे, असा संस्थेचा सवाल आहे.

खुले असणारे पाणी मीटर कुलूपबंद कसे

संस्थेचे पाणी मीटर बाहेरच्या बाजूस आणि कायमस्वरूपी खुले असताना मीटर रीडरकडून मात्र कुलूप बंद असे चुकीचे शेरे नोंदविण्यात आल्याचेही संस्थेच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
 

 

Web Title: 44 thousand bill without water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.