कोल्हापूर परिक्षेत्रातील ४२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नवीन १७ अधिकारी होणार रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 04:11 PM2019-02-19T16:11:23+5:302019-02-19T16:15:57+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील दोन आणि तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेल्या आणि मूळ जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या ४२ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या परिक्षेत्राअंतर्गत बदल्यांचे गॅझेट विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी रात्री जाहीर केले. कोल्हापुर जिल्ह्यातून १८ अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली. त्यांचे जागी १७ नवीन अधिकारी लवकरचं रुजू होणार आहेत.

42 police officers transfer in Kolhapur range | कोल्हापूर परिक्षेत्रातील ४२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नवीन १७ अधिकारी होणार रुजू

कोल्हापूर परिक्षेत्रातील ४२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नवीन १७ अधिकारी होणार रुजू

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर परिक्षेत्रातील ४२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याकोल्हापूरातून १८ अधिकाऱ्यांची जिल्हाबाहेर बदली, नवीन १७ अधिकारी होणार रुजू

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील दोन आणि तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेल्या आणि मूळ जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या ४२ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या परिक्षेत्राअंतर्गत बदल्यांचे गॅझेट विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी रात्री जाहीर केले. कोल्हापुर जिल्ह्यातून १८ अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली. त्यांचे जागी १७ नवीन अधिकारी लवकरचं रुजू होणार आहेत.

कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत परिक्षेत्रात दोन व तीन वर्षे पूर्ण झालेल्या पोलीस उपअधीक्षक, निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु होती. हक्काच्या व सोईच्या ठिकाणी वर्णी लागावी, यासाठी अधिकाऱ्यांनी विनंती बदलीची मागणी केली होती. विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. सोमवारी रात्री अधिकाऱ्यांचे बदलीचे गॅझेट जाहीर केले.

बहुतांशी अधिकारी तळ ठोकून

कोल्हापूर जिल्ह्यातून ४८ अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या होणार होत्या. त्यापैकी १८ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पोलीस ठाणे प्रभारी असणारे बहुतांशी निरीक्षक, सहायक निरीक्षक अद्यापही जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. त्यांच्या बदल्या होणे अपेक्षीत होते. परंतू त्या रोखण्यात आल्याने उलट-सुटल चर्चा पोलीस दलात आहे. अशीच परिस्थिती सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये आहे.

पोलीस निरीक्षक (कंसात बदलीचे ठिकाण)

कोल्हापूर : बिपिन व्यंकटेश हसबनीस (सांगली), संदीप किसनराव भागवत (सातारा), औदुंबर भाचलंद्र पाटील (पुणे ग्रामीण).
सांगली : कल्लाप्पा सुत्तु पुजारी (सोलापूर ग्रामीण), प्रताप धोंडीराम पोमण (सातारा), रविंद्र गणपतराव डोंगरे (सोलापूर ग्रामीण), प्रकाश दामोदर गायकवाड (कोल्हापूर)
सातारा : दत्तात्रय गणपती नाळे (सोलापूर ग्रामीण), चंद्रकांत शंकरराव बेदरे (सांगली), आण्णासाहेब बाळासाहेब घोलप (पुणे ग्रामीण).
पुणे ग्रामीण : पांडुरंग मारुती सुतार (सांगली), भागवत विठ्ठलराव मुंढे (सोलापूर ग्रामीण), मुगुटलाल भानुदास पाटील (सातारा)
सोलापूर ग्रामीण : संजय ज्ञानदेव सुर्वे (सांगली), दिलीप बबनराव लुकडे (पुणे ग्रामीण), सुधाकर भिमराव कोरे (पुणे ग्रामीण), ईश्वर दौलतराव ओमासे, सुहास लक्ष्मण जगताप (कोल्हापूर), आनंदराव तुकाराम खोबरे (सातारा).

सहायक पोलीस निरीक्षक

कोल्हापूर : संगिता शशिकांत माने (सातारा), संजय आकाराम हारुगडे (सांगली).
सातारा : संतोष दत्तगिरी गोसावी (सांगली), बबन भागुजी येडगे (सोलापूर ग्रामीण), अनिल किसन गुजर (पुणे ग्रामीण), बजरंग शामराव कापसे (सोलापूर ग्रामीण).
सोलापूर ग्रामीण : महेश शिवलिंग भावीकट्टी (सातारा), शाम विनायक बुवा (सातारा), अविनाश ज्ञानेश्वर माने (कोल्हापूर), कुमार गुलाब घाडगे (सातारा).
पुणे ग्रामीण : सुधीर आनंदराव तोरडमल (सोलापूर ग्रामीण), अरविंद बाळू काटे (सांगली)

पोलीस उपनिरीक्षक

कोल्हापूर : ज्योती रघुनाथ चव्हाण , समीक्षा प्रकाश पाटील, भरत तुकाराम पाटील, उदय बाळासो दळवी, राजु लक्ष्मण डांगे, प्रविण सर्जेराव जाधव (सर्व. सातारा), दिलीप विष्णु ढेरे, महादेव वसंत जठार, अजित आनंदा पाटील, रोहिदास धर्मु पवार, गणेश धनश्याम माने, अक्षयकुमार अनिल ठिकणे (सर्व सांगली).
सांगली : अजित वसंत भोसले, नंदकुमार हणुमंत सोनवलकर,सचिन नकुल वसमळे, योगेश श्रीरंग पाटील, प्रियंका महादेव सराटे, सुजाता शिवाजी पाटील (सर्व. कोल्हापूर).
सातारा : प्रमोद भास्कर कदम,नसीमखान हमिदखान फरास, विजय शामराव चव्हाण, सुनील खंडेराव कुंभार, अनिल विष्णु चौधरी विलास गोविंद कुबडे, पोपट शंकर कदम (कोल्हापूर), मैनुद्दीन अकबर खान, प्रकाश नामदेव इंगळे, दिनेश जयसिंग कुंभार (सोलापूर ग्रामीण), योगेश अधिकराव शेलार (पुणे ग्रामीण).
सोलापूर ग्रामीण : शिवकुमार नागनाथ जाधव, अनिल रामहरी कदम, शंकर बसवंत पाटील, राजेंद्र चंद्रकांत कदम, संजय हेमंत मोतेकर (सातारा).
पुणे ग्रामीण : किरण रामेश्वर घोंगडे, छबु भागचंद बेरड (सोलापूर ग्रामीण).
 

 

Web Title: 42 police officers transfer in Kolhapur range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.