कोल्हापूर जिल्'ात ४० हजार एकर सिंचनक्षेत्रात वाढ शक्य, सुरेश हाळवणकर, मुख्यमंत्र्यांकडे करणार निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:19 PM2017-11-23T23:19:12+5:302017-11-23T23:24:24+5:30

कोल्हापूर : जिल्'ातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पामुळे सुमारे १० टीएमसी पाणी हे कर्नाटकमध्ये वाहून जात आहे. हे पाणी अडविल्यास कोल्हापूर जिल्'ातील ४० हजार एकर जमीन सिंचन क्षेत्राखाली येणार आहे.

40 thousand acres of irrigation can be increased in Kolhapur district, Suresh Halwankar and CM demand funds | कोल्हापूर जिल्'ात ४० हजार एकर सिंचनक्षेत्रात वाढ शक्य, सुरेश हाळवणकर, मुख्यमंत्र्यांकडे करणार निधीची मागणी

कोल्हापूर जिल्'ात ४० हजार एकर सिंचनक्षेत्रात वाढ शक्य, सुरेश हाळवणकर, मुख्यमंत्र्यांकडे करणार निधीची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व प्रकल्प पूर्ण झाल्यास आठ टीएमसी पाणीसाठा होऊ शकणार अपूर्ण लघुसिंचन प्रकल्प, चिकोत्रा समन्यायी उपसा व ठिंबक सिंचन प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक कृष्णा खोरे लवादानुसार कोल्हापूर जिल्'ासाठी ११० टीएमसी पाणीसाठा अडवण्याचे नियोजन

कोल्हापूर : जिल्'ातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पामुळे सुमारे १० टीएमसी पाणी हे कर्नाटकमध्ये वाहून जात आहे. हे पाणी अडविल्यास कोल्हापूर जिल्'ातील ४० हजार एकर जमीन सिंचन क्षेत्राखाली येणार आहे. त्यामुळे या निधीअभावी रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली आहे. हीच मागणी घेऊन ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून, याबाबत तातडीने स्वतंत्र बैठक घेण्याचीही त्यांची मागणी आहे.

कोल्हापूर जिल्'ात सध्या जे प्रकल्प रखडलेत यातील बहुतांश प्रकल्पांना याआधीच्या युतीच्या शासनकाळातच परवानगी मिळाली होती. भाजपच्या पुढाकाराने गेल्या वर्षी तमनाकवाडा येथे पाणी परिषदही घेण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर या प्रकल्पांसाठी निधी मिळावा यासाठी कोल्हापूर जिल्'ाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास, कृषी, पुनर्वसन मंत्री व अधिकारी यांची खास बैठक बोलवावी, अशी मागणी आमदार हाळवणकर यांनी केली आहे.

कृष्णा खोरे लवादानुसार कोल्हापूर जिल्'ासाठी ११० टीएमसी पाणीसाठा अडवण्याचे नियोजन आहे. आजअखेर सर्व प्रकल्पांमधून कोल्हापूर जिल्'ात १०० टीएमसी पाणी अडवले जाते. अजूनही १० टीएमसी पाणी अडवणे शक्य आहे. अपूर्ण लघुसिंचन प्रकल्प, चिकोत्रा समन्यायी उपसा व ठिंबक सिंचन प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. चिकोत्रा समन्यायी उपसा व ठिबक सिंचन प्रकल्पाला २०१२ साली प्रशासकीय परवानगी मिळाली आहे.

० ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेचे लघुपाटबंधारे तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, बंधारे असे स्थानिक स्तरावर १६७ लघुजलसिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. या सर्व प्रकल्पांमधून दोन टीएमसी पाणीसाठा होऊ शकतो. २०१६ च्या आर्थिक मापदंडानुसार कोणत्याच प्रकल्पाचे काम पूर्ण होत नाही. त्यामुळे रॉयल्टीची रक्कम भूसंपादन रक्कम वगळून सदर मापदंड वापरण्यास परवानगी मिळाल्यास सध्याचे मापदंड व्यवहार्य ठरतात. याबाबत तोडगा काढण्याची गरज आमदार हाळवणकर यांनी व्यक्त केली आहे.

हत्ती गेला अन् शेपूट राहिले!
नागनवाडी, उचंगी, आंबेओहोळ, झांबरे, सर्फनाला, धामणी, सोनुर्ले हे सात सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. केवळ २५ टक्के काम राहिल्याने प्रचंड मोठी रक्कम गुंतुनही पाणीसाठा मात्र करता येत नाही, अशी या प्रकल्पांची अवस्था आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यास आठ टीएमसी पाणीसाठा होऊ शकणार आहे. तसेच अंदाजे ४० हजार एकर जमीन सिंचनाखाली येईल, तर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ८० हजार क्षेत्र ओलिताखाली आणता येणार आहे.

चंद्रकांतदादांच्या निवासस्थानी चर्चा शक्य
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात आल्यानंतर थेट पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. या ठिकाणी चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली आमदार हाळवणकर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची शक्यता असून, तेथे कोल्हापूर जिल्'ातील या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे.

हे प्रकल्प आहेत अर्धवट
नागनवाडी (ता. भुदरगड), उचंगी, आंबेओहोळ, सर्फनाला, किटवडे (ता. आजरा), सोनुर्ले (ता. शाहूवाडी), झांबरे, कांर्जिणे (ता. चंदगड), धामणी (ता. राधानगरी)
 

 

Web Title: 40 thousand acres of irrigation can be increased in Kolhapur district, Suresh Halwankar and CM demand funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.