५० गुणासाठी ४० गुणांचा पेपर--मूल्यमापन चाचणीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 1:05am

कोल्हापूर : शिक्षण खाते संकलित मूल्यमापन चाचणी वेळेत घेण्यात अपयशी ठरल्यानंतर आता प्रश्नपत्रिका काढतानाही गोंधळ कायम ठेवला आहे.

वीरकुमार पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिक्षण खाते संकलित मूल्यमापन चाचणी वेळेत घेण्यात अपयशी ठरल्यानंतर आता प्रश्नपत्रिका काढतानाही गोंधळ कायम ठेवला आहे. शुक्रवारी (दि. १०) मराठी माध्यमातील ७ वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची (तृतीय भाषा) प्रश्नपत्रिका ५० ऐवजी ४० गुणांची मिळाली. ही चूक लक्षात आल्यावर प्रश्नपत्रिका बदलण्याऐवजी याच प्रश्नपत्रिकेसाठी ५० गुण द्यावेत, असा आदेश काढून परीक्षेच्या हेतूलाच हरताळ फासला. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून १ ली ते ८ वी पर्यंत तीन चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यात येत आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांच्या लेखी परीक्षेसाठी ५० व तोंडीसाठी १० गुण आहेत. ही चाचणी बुधवार (दि. ८) पासून सुरू झालेली आहे. शुक्रवारी मराठी माध्यमाचा इंग्रजीचा पेपर झाला. हा पेपरही ५० गुणांचा, पण प्रश्नपत्रिका मिळाली ४० गुणांची. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला.+++ प्रश्न क्र. मूळ सुचविलेले प्रश्नपत्रिकेतील गुण गुण बदल प्रश्न क्र. १ ८ ८ प्रश्न क्र. २ २ ४ प्रश्न क्र. ३ १६ २0 प्रश्न क्र. ४ १४ १८ एकूण ४0 ५0 संकलित चाचणीसाठी सीलबंद प्रश्नपत्रिका येत असल्यामुळे सकाळी प्रश्नपत्रिका संच उघडल्यानंतर ४० गुणांची प्रश्नपत्रिका आहे हे लक्षात आले. त्यामुळे परिपत्रकानुसार सुधारित गुण देण्याचे सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे. - सुभाष चौगले, जि. प. प्राथमिक शिक्षण अधिकारी. सातवीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका ४० गुणांची काढून गोंधळात भर पडली आहे. शासनाकडून हा बेफिकीरपणा झाला आहे. जिल्हा माध्य. मुख्याध्यापक संघ या विरोधात आवाज उठवणार आहे. ही चाचणीच बंद करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. - विलास पोवार अध्यक्ष, जिल्हा माध्य. मुख्याध्यापक संघ.

संबंधित

महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकरांच्या कारला अपघात
कोल्हापूर : ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन
कोल्हापूर :शिष्यवृत्ती विषयातील परिपत्रकाची ‘अभाविप’तर्फे होळी
मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली! शरद पवार यांची मिश्कील खंत
बालमैत्रिणींनी घेतले प्रेमासाठी विष; एकीचा मृत्यू

कोल्हापूर कडून आणखी

पोलिसांची बंदूक गावकऱ्यांच्या खांद्यावर : गावकऱ्यांचा ‘निशाणा’ पोलिसांवरच
कोल्हापूर जिल्ह्यातील २४ प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय
अंबाबाई मंदिर परिसरातील गर्दीवर नियंत्रण हवे : भाविकांचा श्वास कोंडतोय
दोन तरुणांच्या संकल्पनेतून बनाचीवाडी ग्रामपंचायतीची तंत्रज्ञानाकडे वाटचाल
कोल्हापूर : बारावीच्या परीक्षेला प्रारंभ; केंद्रांवर बाहेर पालकांची गर्दी

आणखी वाचा