कचरा उघड्यावर टाकल्यास १ हजारचा दंड -- : कºहाड पालिकेकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:27 AM2019-06-25T00:27:10+5:302019-06-25T01:02:25+5:30

परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास संबंधितावर लगेच दंडात्मक कारवाई केली जाते. असाच नियम कºहाड पालिकेनं कºहाडकरांसाठीही लागू केलाय. सध्या कºहाड शहरात उघड्यावर कोणी प्लास्टिक कचरा टाकताना अथवा प्लास्टिक

1 thousand penalty if the garbage is open: - Action by the corporation | कचरा उघड्यावर टाकल्यास १ हजारचा दंड -- : कºहाड पालिकेकडून कारवाई

कचरा उघड्यावर टाकल्यास १ हजारचा दंड -- : कºहाड पालिकेकडून कारवाई

Next
ठळक मुद्देप्लास्टिक पिशव्या बंदीसाठी कठोर पाऊल

कºहाड : परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास संबंधितावर लगेच दंडात्मक कारवाई केली जाते. असाच नियम कºहाड पालिकेनं कºहाडकरांसाठीही लागू केलाय. सध्या कºहाड शहरात उघड्यावर कोणी प्लास्टिक कचरा टाकताना अथवा प्लास्टिक पिशव्या जवळ बाळगताना आढळून आल्यास संबंधितास हजार रुपयांपर्यंत दंड केला जात आहे. या नियमांतर्गत पालिकेने आतापर्यंत अनेकांना दीडशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत दंड केला आहे.

राज्य शासनाने वर्षभरापूर्वी प्लास्टिक बंदीची घोषणा केली आणि त्या घोषणेची कठोर स्वरुपात अंमलबजावणी करण्याचे आदेश पालिका, जिल्हा परिषद अन् पंचायत समिती, ग्रामपंचायतींना दिले. त्यानुसार कºहाड पालिकेकडून या घोषणेची शहरात सध्या चांगलीच अंमलबजावणी केली जात आहे. रस्त्याने प्रवास करणारा प्रवासी, नागरिक अथवा दुकानदार उघड्यावर कचरा टाकताना आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जात आहे. याबाबत मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी थेट कारवाईच्या सूचना संबंधित पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

कºहाड पालिकेच्या वतीने शहरातील घरांमधील ओला व सुका कचरा रस्त्यावर न पडता तो थेट कचरा डेपात घनकचरा प्रक्रियेसाठी जावा, यासाठी बकेटचे वाटप केले आहे. तसेच सध्या शहरातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यावर दिवसांतून दोनदा सफाई कर्मचाऱ्यांकडून पडलेला कचरा एकत्रित करण्यास सुरुवात केली आहे. तर नागरिकांसाठीही सूचनांचे फलकही रस्त्याकडेला लावलेले आहेत.

कारवाईसाठी पथकाची नियुक्ती
शहरात पालिकेतील प्रभागांसह वाढीव हद्दीत व सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर व नाल्यांमध्ये कचरा टाकणाºयांवर तसेच उघड्यावर शौचालयास बसणाºयांवर थेट कारवाई केली जाणार आहे. यासाठी पालिकेतील एकूण नऊ मुकादम आणि त्यांच्या अंतर्गत अठरा कर्मचारी असे पथक तयार करण्यात आले आहे.

ड्रेनेजचे पाणी सोडणाºयास दहा हजारांचा दंड
कºहाड शहरात राहणाºया नागरिकांपैकी कोणी मैलामिश्रित ड्रेनेजचे सांडपाणी, मैला ड्रेनेज पाईप अथवा उघड्यावर सोडल्यास पालिकेकडून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पालिकेच्या वतीने दहा हजार रुपये दंडही संबधितांस केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पालिकेच्या या नियमांमुळे मैला तसेच सांडपाणी उघड्यावर पडण्याचे प्रमाण कमी होणार, हे नक्की !

प्लास्टिक पिशव्या वापरणाºयास शिक्षा...

पहिला गुन्हा : ५ हजार रुपये
दुसरा गुन्हा : १० हजार रुपये

तिसरा गुन्हा : २५ हजार रुपये व तीन महिने कारावास

Web Title: 1 thousand penalty if the garbage is open: - Action by the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.