Pro Kabaddi: कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, चाहते संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 06:18 PM2018-09-18T18:18:14+5:302018-09-18T18:18:28+5:30

Pro Kabaddi: प्रो कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. प्रो कबड्डीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सहाव्या सत्राची नवीन तारीख पोस्ट करण्यात आली.

Pro Kabaddi: Kabaddi League schedule changes again | Pro Kabaddi: कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, चाहते संभ्रमात

Pro Kabaddi: कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, चाहते संभ्रमात

googlenewsNext

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. प्रो कबड्डीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सहाव्या सत्राची नवीन तारीख पोस्ट करण्यात आली. त्यानुसार ही लीग 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. आधीच्या तारखेनुसार ही लीग 5 ऑक्टोबरला सुरू होणार होती.  



या बदललेल्या तारखेमुळे पुढील सर्व वेळापत्रक बदलणार आहे, मात्र त्याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. प्रो कबड्डी लीगच्या तारखेत बदल होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी पुण्यातील लीग सामन्यांत बदल करण्यात आला होता. पुण्यातील लीग सामने 19 ऑक्टोबर ऐवजी 18 ऑक्टोबरला खेळवण्याचा निर्णय घेतण्यात आला होता.  सततच्या या बदलांमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

Web Title: Pro Kabaddi: Kabaddi League schedule changes again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.