राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 07:22 PM2019-01-17T19:22:17+5:302019-01-17T19:23:37+5:30

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने दि. १५ जानेवारी रोजी शिवाजी पार्क येथे खेळाडूंची निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती.

Maharashtra kabaddi team declare for national compitition | राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर

Next

मुंबई :  किशोर-किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा २१ जानेवारी ते २४ जानेवारी २०१९ या कालावधीत पाटलीपुत्र पाटणा, बिहार येथे आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे किशोर-किशोरी असे दोन संघ सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने दि. १५ जानेवारी रोजी शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे खेळाडूंची निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. याशिबिरासाठी २३ जिल्ह्यातील एकूण ८५ मुले व ७० मुलींनी सहभाग घेतला होता. 

किशोरी गट मुलीच्या निवड समिती मध्ये श्रीमती वर्धा वेळणेकर (म्हात्रे) (मुं. उपनगर), सूर्यकांत ठाकूर (रायगड), मुरलीधर राठोड (औरंगाबाद). यांनी काम केलं. तर किशोर गट मुलाच्या निवड समिती मध्ये नितीन बर्डे (जळगाव), धर्मपाल गायकवाड (सोलापूर), विकास पवार (रत्नागिरी) यांनी काम पाहिले. शिबिरातून महाराष्ट्राचा किशोर गट मुले व किशोरी गट मुलीचा १२-१२ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. दोन्ही संघ १८ जानेवारी ला बिहार साठी मुंबई येथून रवाना होतील.

 

महाराष्ट्र किशोरी संघ (मुली):- १)रश्मी पाटील (रायगड), २) ऋतू परब, ३)प्राची भादवणकर (दोन्ही मुंबई शहर), ४)प्रशिता पन्हाळकर, ५)आकांक्षा बने (दोन्ही मुं. उपनगर), ६)मयुरी वेखंडे (ठाणे), ७)सनिका नाटेकर (रत्नागिरी), ८)समीक्षा कोल्हे (पुणे), ९)सानिका पाटील (सांगली), १०)ऋतुजा लभडे (नाशिक), ११)आरती चव्हाण (परभणी), १२) ऋतुजा पाठक (औरंगाबाद).

प्रशिक्षक:- शशिकांत ठाकूर (ठाणे), व्यवस्थापक:- अनघा कागंणे (रत्नागिरी).

 

महाराष्ट्र किशोर गट (मुले):- आझाद केवट (मुंबई शहर), शब्बीर रफी शेख (मुंबई उपनगर), दीपक केवट (ठाणे), प्रणव इंदुलकर (रायगड), अमर सिंह कश्यप (रत्नागिरी), राहुल कारे (सांगली), ओम महांगडे (जळगाव), सचिन राठोड (लातूर), राहुल वाघमारे (पुणे), कृष्णा चव्हाण (परभणी), तेजस ढिकले (नाशिक) पियुष पाटील (पालघर)

प्रशिक्षक:- दिगंबार जाधव (परभणी), व्यवस्थापक:-बजरंग परदेशी (नंदुरबार)

Web Title: Maharashtra kabaddi team declare for national compitition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.