कबड्डी : सत्यम, उत्कर्ष, संघर्ष या संघांनी उपांत्य फेरी गाठली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 07:27 PM2018-12-14T19:27:01+5:302018-12-14T19:27:46+5:30

दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात उत्कर्षने स्फूर्तीवर १७-११अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Kabaddi: Satyam, Uttarkash teams reached the semifinals | कबड्डी : सत्यम, उत्कर्ष, संघर्ष या संघांनी उपांत्य फेरी गाठली

कबड्डी : सत्यम, उत्कर्ष, संघर्ष या संघांनी उपांत्य फेरी गाठली

googlenewsNext

 मुंबई : मी मुंबईकर क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी महोत्सवाच्या प्रथम श्रेणी पुरुष गटामध्ये सत्यम, उत्कर्ष, संघर्ष या संघांनी उपांत्य फेरी गाठली. तर महिलांत महात्मा गांधी, स्वस्तिक उपांत्य फेरीत धडकले. घाटकोपर(प.) येथील कांतीलाल मगनलाल शहा क्रीडांगणावर सुरू असलेल्या प्रथम श्रेणी पुरुषांत सत्यमने वीर परशुरामचा प्रतिकार ३५-२७असा संपविला. मध्यांतराला २०-११अशी आघाडी घेणाऱ्या सत्यमच्या भीमकाय देहयष्टी असलेल्या नितीन देशमुखच्या आक्रमणाला वीर परशुरामकडे उत्तर नव्हते. परशुरामचा अभिषेक पडेलकर छान खेळला. 

दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात उत्कर्षने स्फूर्तीवर १७-११अशी मात करीत उपांत्य फेरी गाठली. नितीन घोगळे, अक्षय परब यांच्या चतुरस्त्र खेळाला याचे श्रेय जाते. संघर्षने संकल्पवर २६-११अशी सहज मात करीत उपांत्य फेरी गाठली. मध्यांतराला ९-७अशी आघाडी घेणाऱ्या संघर्षने नंतर मात्र जोरदार खेळ करीत हा विजय साकारला. पंकज भोसले या विजयाचा शिल्पकार ठरला. 

महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महात्मा गांधीने आराध्याचा ४०-११असा धुव्वा उडविला. १६-०६अशी विश्रांतीला विजयी संघाकडे आघाडी होती. सायली जाधव, अक्षदा म्हात्रे, तेजस्वी पाटेकर यांच्या चढाई-पकडीच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. आराध्यांची हरणीकौर संधू बरी खेळली. दुसऱ्या सामन्यात स्वस्तिकने स्वराज्यला १९-१५असे नमवित आपली घोडदौड चालू ठेवली. मध्यांतराला स्वस्तिक संघ ६-७असे पिछाडीवर होते. चेतना बटावले, अमिता चाळके यांच्या महत्वपूर्ण खेळाला स्वस्तिकच्या विजयाचे श्रेय जाते. स्वराज्यची काजल खैरे निकाराने लढली. 

द्वितीय श्रेणी पुरुषांत ओम साईनें नवरत्नवर २३-१९ अशी मात करीत आगेकूच केली. साईकडून धर्मेंद्र चौरसिया, तर नवरत्नकडून प्रफुल्ल बागवे उत्तम खेळले. दुसऱ्या सामन्यात बालमित्रने मनीष चव्हाणच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर सक्षमचा ३०-१८ असा पाडाव केला. सक्षमचा महादेव बने बरा खेळला. शेवटच्या सामन्यात गावदेवीने बालवीरचा २६-१३ असा पराभव केला.

Web Title: Kabaddi: Satyam, Uttarkash teams reached the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kabaddiकबड्डी