कबड्डी : पुरुषांमध्ये कामठी तर महिलांमध्ये नागपूर संघ अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 10:05 PM2019-01-21T22:05:26+5:302019-01-21T22:07:15+5:30

पुरुष गटातील अंतिम सामना जीआरसी कामठी (41) व मराठा लान्सर नागपूर (२९) संघात रंगला.

Kabaddi: Kamthi in men and women in Nagpur team's are winner | कबड्डी : पुरुषांमध्ये कामठी तर महिलांमध्ये नागपूर संघ अजिंक्य

कबड्डी : पुरुषांमध्ये कामठी तर महिलांमध्ये नागपूर संघ अजिंक्य

Next

अमरावती : अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातील सामन्यांमध्ये बीआरसी कामठी, तर महिला गटातील सामन्यांमध्ये संघर्ष नागपूर संघाने बाजी मारली. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेले सामने पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
 येथील गाडगे बाबा बहुउद्देशीय मंडळ राधानगर व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दादासाहेब काळमेघ स्मृतिप्रीत्यर्थ राधा नगरातील मैदानावर रंगलेल्या महिला गटातील अंतिम सामन्यात संघर्ष क्रीडा मंडळ (४५) नागपूर व समर्थ क्रीडा मंडळ (३४) अमरावती मध्ये रंगला शेवटपर्यंत नागरिकांचा श्वास रोखणारा हा सामना ठरला. शेवटच्या क्षणात नागपूर संघाने बाजी मारली. पुरुष गटातील अंतिम सामना जीआरसी कामठी (41) व मराठा लान्सर नागपूर (२९) संघात रंगला. यामध्ये कामठी संघाने संघर्ष नागपूरवर उत्सकृष्ट चढाई करीत १२ गुणाच्या आघाडीने जेतेपद पटकावले. खासदार आनंदराव अडसूळ, आमदार बच्चू कडू, ओएचडी सुधीर दिवे, डॉ. भुपेश भोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके, माजी आमदार सुलभा खोडके, शिवसेनेचे  राजेश वानखेडे, महापालिकाचे चेतन गावंडे, नितीन गुडधे, सुधीर महाजन डॉ. अद्वेत  महल्ले, लक्ष्मी बोंडे आदी  हस्ते  विजयी संघाच्या खेळाडूंना पारितोषिक रोख रक्कम देण्यात  आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भुयार व सर्व पदाधिकाºयांची उपस्थिती होती.

उत्कृष्ट खेळांचा बहुमान
समता क्रीडा मंडळाची सुषमा अंधारे वुमन आॅफ द मॅच, तर मराठा लान्सर नागपूरचा शुभम पालकर मॅन आॅफ द मॅच ठरला. जीआरसी कंपनी संघाचा कमलसिंग 'बेस्ट लेयर' ठरला. बेस्ट प्लेयर संघर्ष नागपूर संघाचा पिंकी बानते ठरली.

Web Title: Kabaddi: Kamthi in men and women in Nagpur team's are winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.