दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जर्मनीवर टाकला होता बॉम्ब, ७० वर्षांनी फुटला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:37 PM2019-04-16T12:37:28+5:302019-04-16T12:39:06+5:30

जर्मनीच्या फ्रॅंकफर्ट शहरात रविवारी माइन नदीमध्ये दुसऱ्या महायुद्धातील एक बॉम्ब आढळला. रिपोर्टनुसार, हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकन विमानाने पाडला होता.

World War 2 bomb defused after 70 years in Germany Frankfurt | दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जर्मनीवर टाकला होता बॉम्ब, ७० वर्षांनी फुटला!

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जर्मनीवर टाकला होता बॉम्ब, ७० वर्षांनी फुटला!

जर्मनीच्या फ्रॅंकफर्ट शहरात रविवारी माइन नदीमध्ये दुसऱ्या महायुद्धातील एक बॉम्ब आढळला. रिपोर्टनुसार, हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकन विमानाने पाडला होता. इतक्या वर्षांनंतरही हा बॉम्ब जिवंत होता. त्यामुळे बॉम्ब शोधक पथकाने नियंत्रित विस्फोटाच्या माध्यमातून हा बॉम्ब फोडून निष्क्रिय केला. हा धमाका इतका जोरदार होता की, नदीतील पाणी ३० मीटर उंच उडालं होतं. 
हा जोरदार धमाका करण्याआधी आजूबाजूच्या ६०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. असे सांगितले जात आहे की, या संपूर्ण अभियानदरम्यान फायर ब्रिगेड, पोलीस आणि रेड क्रॉसचे ३५० अधिकारी मदतीसाठी उपस्थित होते. 

बॉम्बचा शोध कसा लागला?

रिपोर्ट्सनुसार, ९ एप्रिलला फायर ब्रिगेडची टीम नदीमध्ये डायव्हिंगचा सराव करत होती. यादरम्यान त्यांना हा बॉम्ब आढळला. त्यांनी सुरुवातीला हा बॉम्ब डिफ्यूज करण्याचा प्रयत्न केला. पण हा २५० किलो वजनाचा बॉम्ब डिफ्यूज करताना फुटू शकतो अशी भीती करण्यात आली होती. 

बॉम्ब शोधक पथक हा बॉम्ब नदीत साधारण ५ ते ६ मीटर खोल घेऊन गेले. त्यानंतर या बॉम्बचा धमाका करण्यात आला. नदीतील जीवांना काही धोका होऊ नये म्हणूण नदीत आधी छोटे स्फोट करण्यात आले. जेणेकरुन नदीतील जीव दूर निघून जातील. 

जर्मनीत आताही मिळतात बॉम्ब

भलेही दुसऱ्या महायुद्धाला ७० वर्षे लोटली असली तरी सुद्धा अजूनही त्या काळातील जिवंत सक्रिय बॉम्ब आढळतात. दुसरं महायुद्ध हे १९४५ मध्ये संपलं होतं. यात मोठ्या संख्येने सैनिक मारले गेले होते. त्यावेळी जर्मनीवर टाकण्यात आलेले काही बॉम्ब फुटलेच नाहीत. त्यामुळे हे बॉम्ब आताही फुटण्याचा धोका असतो.   

Web Title: World War 2 bomb defused after 70 years in Germany Frankfurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.