'या' महिलेची आवड वाचून तुमच्या तोंडाला येईल फेसच फेस!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 12:54 PM2019-02-19T12:54:42+5:302019-02-19T12:56:52+5:30

कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी आजकाल त्या वस्तूचे रिव्ह्यू वाचून मग ती वस्तू खरेदी केली जाते.

Woman goes viral for reviewing bathing soap on how good they taste | 'या' महिलेची आवड वाचून तुमच्या तोंडाला येईल फेसच फेस!

'या' महिलेची आवड वाचून तुमच्या तोंडाला येईल फेसच फेस!

googlenewsNext

कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी आजकाल त्या वस्तूचे रिव्ह्यू वाचून मग ती वस्तू खरेदी केली जाते. आज असे वेगवेगळ्या प्रॉडक्टचे कितीतरी रिव्ह्यू वाचायला आणि बघायला मिळतात. इंडोनेशियातील एक महिला आहे खोसिक असयिफा. सध्या या महिलेने इन्स्टाग्रावर धुमाकूळ घातला आहे. ही महिला वेगवेगळ्या ब्रॅंडच्या साबणांचे रिव्ह्यू करते. पण हिची रिव्ह्यू करण्याची पद्धत फारच वेगळी आहे. म्हणजे ती साबण खाऊन त्यांचा रिव्ह्यू करते. 

आइस्क्रीमसारखी चाटते साबण

इंडोनेशियातील जावा प्रांतात राहणारी ही खोसिक असयिफा ही तिच्या वेगळ्या आणि विचित्र स्टाइलमुळे चर्चेत आली आहे. तुम्हाला वाटत असेल की, साबण केवळ जीभेवर ठेवून ती त्यांचा रिव्ह्यू करते. तर तसं नाहीये. ती साबण चक्क आयस्क्रीमसारखी चाटते आणि खातेही. 

आठवड्यातून एक व्हिडीओ

कमालीची बाब म्हणजे या महिलेचे व्हिडीओ लोकांना पसंतही पडतात आणि त्यांना धडाधड लाइक्सही मिळतात. इतकेच नाही तर लोक तिला काही पर्यायही सुचवतात. ते तिला सांगतात की, त्यांना कोणत्या ब्रॅंन्डचा रिव्ह्यू बघायचा आहे. 

दोन वर्षांपूर्वी लागली साबण खाण्याची सवय

एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत २१ वर्षीय खोसिकने सांगितले की, 'मी पहिल्यांदा दोन वर्षांपूर्वी साबण सुरू केलं होतं. तेव्हा मी गर्भवती होती. गर्भवती महिलांना यादरम्यान काही वेगळं खाण्याचे डोहाळे लागत असतात. मला साबण खाण्याचे डोहाळे लागले होते. आंघोळ करताना मी पहिल्यांदा साबणाची टेस्ट घेतली होती. साबणाची टेस्ट मला फळांसारखी वाटते'.

काही लोकांची टिका

खोसिक सांगते की, तिला माहीत आहे ही सवय विचित्र आहे. म्हणून तिने पतीला सांगितलं नाही. ती सांगते की, याने तिला पोटाचीही कोणती समस्या झाली नाही. तर काही लोकांनी तिच्यावर टिकाही केली आहे. ते म्हणतात की, हा एक पब्लिसिटी स्टंट आहे. 
 

Web Title: Woman goes viral for reviewing bathing soap on how good they taste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.